मनोरंजन

मराठीतील या अभिनेत्याचे ४० व्या वर्षी निधन ; 12 वर्षांहून अधिक काळ रंगभूमीवर केले काम

प्रतिनिधी

१२ वर्षापेक्षा अधिक काळ रंगभूमीवर काम करणाऱ्या मराठमोळा अभिनेता सुनील होळकर (Sunil Holkar) याचे निधन झाले आहे. त्याने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' यासह अनेक हिंदी आणि मराठी टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. वयाच्या ४० व्या वर्षी त्याचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून यकृताच्या आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र शुक्रवारी, १३ जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले.

सुनीलने अखेरचा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'गोष्ट एक पैठणीची' या चित्रपटात काम केले होते. सुनीलच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण

आज पनवेल, कल्याण, अंबरनाथ तापणार; ४४ अंश तापमानाचा अंदाज