मनोरंजन

सलमान खानला पुन्हा धमकीचा मेसेज;'बिष्णोई मंदिरात माफी माग, नाहीतर पाच कोटी दे'

सिनेअभिनेता सलमान खान याला पुन्हा बिष्णोई टोळीच्या नावाने धमकीचा मेसेज आला आहे. बिष्णोई समाजाच्या मंदिरात जाऊन सलमानने माफी मागावी नाहीतर पाच कोटी रुपयांची खंडणीची रक्कम द्यावी, असे मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : सिनेअभिनेता सलमान खान याला पुन्हा बिष्णोई टोळीच्या नावाने धमकीचा मेसेज आला आहे. बिष्णोई समाजाच्या मंदिरात जाऊन सलमानने माफी मागावी नाहीतर पाच कोटी रुपयांची खंडणीची रक्कम द्यावी, असे मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कर्नाटक येथून विक्रम नावाच्या एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला सतत धमकीचे मेसेज येत आहे. आता सलमानला पुन्हा बिष्णोई टोळीच्या नावाने नवीन धमकी प्राप्त झाली आहे. मेसेज पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्तीने तो लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ असल्याचे म्हटले आहे. काळवीट शिकारीच्या कथित घटनेवरून सलमानने बिष्णोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, नाहीतर बिष्णोई टोळीला पाच कोटीची खंडणीची रक्कम द्यावी. ही रक्कम दिली नाहीतर परिणाम वाईट होतील, असा धमकीवजा इशारा मेसेजमध्ये देण्यात आला आहे.

हा मेसेज वरळी येथील वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईप मोबाईल क्रमांकावर सोमवारी आला होता. तपासादरम्यान हा मेसेज कर्नाटक येथून पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने विक्रम नावाच्या एका ३५ वर्षांच्या व्यक्तीला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. त्याची पोलिसाकडून चौकशी सुरू आहे. त्याला लवकरच पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार असल्याचे बोलले जाते.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत