मनोरंजन

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात 'या' कलाकाराला अटक; तिच्या कुटुंबाने केले गंभीर आरोप

२० वर्षीय तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यामुळे सिनेसृष्टीमध्ये खळबळ माजली होती. यासंदर्भात तिच्या सहकलाकाराला अटक केली आहे

प्रतिनिधी

अभिनेत्री तुनिषा शर्माने अवघ्या २०व्या वर्षी आत्महत्या केल्यानंतर सिनेक्षेत्रात मोठी खळबळ माजली होती. हिंदी मालिका तसेच चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या तुनिषाने कमी वयात आपली वेगळीच छाप पाडली होती. तिने आत्महत्या केल्यानंतर तिचा सहकलाकार शिझान मोहम्मद खानला पोलिसांनी अटक केली आहे. तुनिषाचा सहकलाकार असलेला शिझान मोहम्मद खान आणि तिचे प्रेमसंबंध होते, पण यातून नैराश्य आल्यामुळे तिने आत्महत्या केली असल्याचे आरोप तुनिषाच्या आईने केले आहेत. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिझान खानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्या अशिलावर केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. सध्या त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिझान खान आणि तुनिषा या दोघशांचेही प्रेमसंबंध होते. १५ दिवसांपूर्वीच त्यांचे ब्रेक झाले होते. यामुळे ती प्रचंड तणावात होती. यामधून आलेल्या नैराश्यामुळे तिने एवढ्या टोकाचे पाऊल उचलले. तुनिषा आणि शिझान खान हेदोघेही 'अलीबाबा- दास्तान ए काबुल' या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत होते. मालिकेचे चित्रीकरण सुरु असतानाच व्हॅनिटीमध्ये तिने स्वतःला गळफास लावून घेतला होता.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस