मनोरंजन

अवघ्या २० वर्षाच्या 'या' अभिनेत्रीने सेटवरच केली आत्महत्या

प्रतिनिधी

प्रसिद्ध हिंदी मालिका अभिनेत्री तुनिषा शर्माने शूटिंगच्या सेटवरच गळफास लावून आत्महत्या केली. अवघ्या २० वर्षाची असलेली तुनिषा ही 'सब टीव्ही'वरील 'दास्तान-ए-काबूल' या हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. तसेच, तिने 'फितूर' चित्रपटात छोट्या कतरिनाची भूमिका साकारली होती. कमी वयात प्रसिद्धीस आलेल्या तुनिषाने एवढं टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, पोलीस त्याचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तुनिषा मालिकेचे शूटिंग करत असताना शनिवारी दुपारी गळफास लावून घेतला. सेटवरील लोकांना हे समजताच तिला नजीकच्या रुग्णालयात घेऊन जाताना तिचा मृत्यू झाला. सेटवरील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडण्याआधी अगदी सामान्य होती. तसेच, आत्महत्येपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर पोस्टदेखील केली होती. वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी सांगितले आहे की, "तुनिषाने नेमकी आत्महत्या का केली? तसेच तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती का?या सर्व गोष्टींचा आम्ही तपास करत आहोत."

तुनिषाने कतरिना कैफच्या 'फितूर' या चित्रपटामध्ये तिच्या बालपणीची भूमिका साकारली. याशिवाय 'अलीबाबा दास्तान ए काबुल'मध्ये ती राजकुमारी मरियमची भूमिका साकारत होती. तसेच, तिने बार बार देखो, कहानी-२, दबंग-३ यांसारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणूनही काम केले आहे.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण