मनोरंजन

‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; मल्याळम सिनेमा ‘अट्टम’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान

देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येते. शुक्रवारी ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नवी दिल्लीत करण्यात आली.

Swapnil S

नवी दिल्ली : मल्याळम चित्रपट ‘अट्टम : द प्ले’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून मराठीत दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या ‘वाळवी’ चित्रपटाने बाजी मारली आहे. तर ‘गुलमोहर’ हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. कोल्हापूरचे दिग्दर्शक आणि निर्माते सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या ‘वारसा’ माहितीपटाला सांस्कृतिक चित्रपट या विभागात सर्वोत्कृष्ट माहितीपट हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येते. शुक्रवारी ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नवी दिल्लीत करण्यात आली.

‘केजीएफ चाप्टर-२’ हा सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट ठरला. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान पटकावला आहे. तर, ‘मुरमूर्स ऑफ द जंगल’ या मराठी माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा व सर्वोत्कृष्ट निवेदक असे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.

सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट - कार्तिकेय २, सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट - पोन्नियिन सेल्वन - भाग १, सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट - बागी दी धी, सर्वोत्कृष्ट मल्ल्याळम चित्रपट - सौदी वेल्लाक्का C.225/2009, सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट - काबेरी अंतरधन, सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट- इमुथी पुथी

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - ए. आर. रेहमान, (प्रीतम), सर्वोत्कृष्ट गायक - (ब्रह्मास्त्र) अरिजितसिंह

सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शनपट - केजीएफ चाप्टर २, सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपट - द कोकोनट ट्री

सर्वोत्कृष्ट निवेदक - मुरमूर्स ऑफ द जंगल (सुमंत शिंदे), सर्वोत्कृष्ट माहितीपट - मुरमूर्स ऑफ द जंगल, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार - श्रीपथ (मलिकपुरम), सर्वोत्कृष्ट छायांकन - रवी वर्मन (पोन्नीयन सेल्वन-१), सर्वोत्कृष्ट पटकथा - आनंद एकार्शी (अट्टम), सर्वोत्कृष्ट संवाद लेखक - अर्पिता मुखर्जी व राहुल छित्तेला (गुलमोहर), सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार - निकी जोशी (कच्छ एक्स्प्रेस), सर्वोत्कृष्ट गीतकार - नौशाद सदर खान (फौजा), सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक - अरिजीत सिंग (ब्रह्मास्त्र), सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका - बॉम्बे जयश्री (सौदी वेल्लक्का सीसी २२५/२००९), सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - जानी मास्टर व सतीश कृष्णन (थिरुचित्रांबलम), विशेष ज्युरी पुरस्कार - मनोज वाजपेयी (गुलमोहर), संजय चौधरी (कधीकान).

पुरस्कार विजेते

सर्वोत्कृष्ट चित्रपट - अट्टम, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - गुलमोहर, सर्वोत्कृष्ट अभिनेता - ऋषभ शेट्टी (कांतारा), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नित्या मेनन (तिरुचित्रबलम) आणि मानसी पारेख (कच्छ एक्स्प्रेस), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सूरज बडजात्या (उंचाई), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - नीना गुप्ता (उंचाई), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - पवन मल्होत्रा (फौजा), सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट - कांतारा, सर्वोत्कृष्ट पदार्पण - प्रमोद कुमार

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी