विशाल निकमने दाखवला त्याच्या 'सौंदर्या'चा चेहरा; 'अर्धांगिनी' म्हणत पोस्ट केला व्हिडीओ, बिग बॉसमध्ये दिली होती 'हिंट'  
मनोरंजन

विशाल निकमने दाखवला त्याच्या 'सौंदर्या'चा चेहरा; 'अर्धांगिनी' म्हणत पोस्ट केला व्हिडीओ, बिग बॉसमध्ये दिली होती 'हिंट'

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता विशाल निकमची 'सौंदर्या' कोण याचं उत्तर अखेर विशालने स्वतःच दिलंय. साधारण ५ वर्षांपूर्वी 'बिग बॉस मराठी ३' च्या घरात असताना त्याने त्याच्या 'सौंदर्या'चा उल्लेख केला होता. तेव्हापासून ही सौंदर्या कोण, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता.

Mayuri Gawade

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता विशाल निकमची 'सौंदर्या' कोण याचं उत्तर अखेर विशालने स्वतःच दिलंय. साधारण ५ वर्षांपूर्वी 'बिग बॉस मराठी ३' च्या घरात असताना त्याने त्याच्या 'सौंदर्या'चा उल्लेख केला होता. तेव्हापासून ही सौंदर्या कोण, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत विशालनेच तिचा चेहरा जगासमोर दाखवला आहे. ही सौंदर्या म्हणजे अभिनेत्री अक्षया हिंदळकर.

'अर्धांगिनी' म्हणत पोस्ट केला रील व्हिडिओ, लग्न करणार?

विशालने अक्षयासोबतचा एक खास रील व्हिडिओ शेअर केला आहे. उल्लेखनीय म्हणजे व्हिडिओसोबत त्याने 'अर्धांगिनी' असे कॅप्शन दिल्यामुळे चाहत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्याचसोबत विशालने आपल्या पोस्टमध्ये, सौंदर्या, प्रेम, सखी, व्हेन लव्ह विन्स (जेव्हा प्रेम जिंकतं) असे टॅग्सही वापरले आहेत, त्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. विशाल लवकरच अक्षयासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या व्हिडीओमध्ये दोघांमधील खास बॉन्डिंग आणि रोमँटिक केमिस्ट्री दिसून येतेय.

‘माझी सौंदर्या…’ पोस्टने वाढवली होती उत्सुकता

काही दिवसांपूर्वी विशालने सोशल मीडियावर "माझी सौंदर्या…" असं कॅप्शन देत काही रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. मात्र या पोस्टमध्ये त्याने तिचा चेहरा जाणीवपूर्वक लपवून ठेवला होता. त्याचवेळी अनेक चाहत्यांनी ही सौंदर्या म्हणजे अभिनेत्री अक्षया हिंदळकर असावी, असा अंदाज बांधला होता. दोघांच्या एकमेकांसाठीच्या सोशल मीडिया पोस्टवरूनही त्याचा अंदाज येत होता. पण दोघांनीही अद्याप आपल्या नात्याबद्ददल अधिकृत वाच्यता केली नव्हती. मात्र आता चाहत्यांचा तोच अंदाज अगदी खरा ठरलाय.

'साता जल्माच्या गाठी'तून नात्याची सुरुवात

विशाल आणि अक्षया यांची ओळख 'साता जल्माच्या गाठी' या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर झाली होती. याच मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं आणि तिथूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच विशालने आपल्या व्हिडिओमध्येही 'साता जल्माच्या गाठी' असं नमूद केल्याचं दिसतंय.

शुभेच्छांचा पाऊस

विशालच्या या अधिकृत पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडतो आहे. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनीही या जोडीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अजित दादा पंचतत्त्वात विलीन! शोकाकूल वातावरणात पार्थ आणि जय पवारांनी दिला मुखाग्नी; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

"दादांना म्हणालो होतो रात्रीच कारने जाऊ, पण..."; अजित पवारांच्या चालकाला 'त्या' रात्रीची आठवण सांगताना अश्रू अनावर

Ajit Pawar death : अपघाताची बातमी दादांच्या आईने पाहिली तेव्हा..."मला दादांना भेटायचे आहे!"

'दादा'ला I Love You सांग...; अजित पवारांवर अंत्यसंस्कारापूर्वी बारामती मेडिकल कॉलेजबाहेर कार्यकर्त्याने फोडला हंबरडा, भावूक Video

एका चुकीबद्दल अन्नपाण्याविना केला होता आत्मक्लेश; यशवंतरावांचे स्मृतिस्थळ होते अजितदादांचे शक्तिस्थळ!