होर्मुझमधून ११ जहाजांचा सुरक्षित प्रवास 
आंतरराष्ट्रीय

होर्मुझमधून ११ जहाजांचा सुरक्षित प्रवास

अमेरिका आणि इराण यांच्यात पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी नुकताच एक सामंजस्य करार झाल्यानंतर भारताकडे येणाऱ्या ११ जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास केला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी नुकताच एक सामंजस्य करार झाल्यानंतर भारताकडे येणाऱ्या ११ जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास केला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी दिली. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारतीय ध्वज असलेली १० जहाजे पर्शियन आखात क्षेत्रात आहेत, तर अलीकडेच दोन जहाजे तेथे पोहोचली आहेत. १७ जून रोजी अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर आतापर्यंत भारताकडे येणाऱ्या ११ जहाजांनी या संवेदनशील मार्गावरून यशस्वीरीत्या प्रवास केला आहे.

जहाजांचा तपशील मालाची वाहतूक

भारतीय ध्वजांकित क्रूड ऑईल टँकर्स: ३ जहाजे (प्रत्येकी २८५,००० मेट्रिक टनांहून अधिक कच्चे तेल), परदेशी ध्वजांकित एलपीजी वाहक: १ जहाज., परदेशी ध्वजांकित क्रूड ऑईल टँकर: १ जहाज, परदेशी ध्वजांकित बल्क कॅरिअर्स: ६ जहाजे (खतांची वाहतूक). परराष्ट्र मंत्रालयाने आशा व्यक्त केली आहे की, पर्शियन आखातात असलेली उर्वरित भारतीय जहाजे देखील लवकरच सुरक्षितपणे होर्मुझ सामुद्रधुनी पार करतील.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले