काबूल : अफगाणिस्ताच्या पूर्वेकडील भागाला रविवारी रात्री उशीरा ६.० रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा बसला त्यामध्ये किमान ८०० लोकांचा मृत्यू झाला असून २,५०० लोक जखमी झाले आहेत.
या भूकंपामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली असून दगडमातीच्या ढिगाऱ्यांखालून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून शोध घेतला जात आहे.