आंतरराष्ट्रीय

भारतीय वंशाच्या अ‍ॅश्ले टेलीस यांना अटक; डिफेन्स डॉक्युमेंट लीक केल्याचा, चीनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचा आरोप

भारतीय वंशाचे संरक्षण रणनीतीकार आणि परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक अ‍ॅश्ले टेलीस यांच्यावर संरक्षणविषयक संवेदनशील माहिती बेकायदेशीरपणे जवळ बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यांना याप्रकरणी अटकही करण्यात आली आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे संरक्षण रणनीतीकार आणि परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक अ‍ॅश्ले टेलीस यांच्यावर संरक्षणविषयक संवेदनशील माहिती बेकायदेशीरपणे जवळ बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यांना याप्रकरणी अटकही करण्यात आली आहे.

तपासकर्त्यांना त्यांच्या व्हर्जिनिया येथील घरी 'टॉप सिक्रेट' आणि 'सिक्रेट' दर्जाची हजारो पाने मिळाली आहेत. याव्यतिरिक्त, व्यावसायिक आणि शैक्षणिक देवाणघेवाणीदरम्यान टेलिस यांनी अनेक वेळा चीनच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे. त्यांना राष्ट्रीय संरक्षण माहिती बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याबद्दल दोषी ठरल्यास दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

सुरक्षेसाठी धोका

टेलीस (६४) हे ‘टाटा चेअर फॉर स्ट्रॅटेजिक अफेअर्स’चे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना फेडरल इनव्हेस्टिगेशनने ताब्यात घेतले. त्यांची गोपनीय सरकारी दस्तऐवज बाळगल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. अ‍ॅश्ले यांच्यावर १८ यूएससी ७९३ (ई) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. तपास यंत्रणा अ‍ॅश्ले यांच्यावरील सुरक्षित स्थळावरून क्लासिफाईड कागदपत्रे हलवणे आणि चीनच्या अधिकाऱ्यांची भेट घेणे या आरोपांचीही चौकशी करत आहेत. युएस ॲटर्नी लिंड्से हालिगेन यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी त्यांनी हा आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे सांगितले.

कोण आहेत अ‍ॅश्ले टेलीस

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि धोरणकर्ते असलेले अ‍ॅश्ले जे. टेलिस हे दक्षिण आशियाई सुरक्षा आणि अमेरिका-भारत संबंधांवरील वॉशिंग्टनमधील प्रमुख तज्ज्ञांपैकी एक म्हणून ओळखले जातात. सध्या ते ‘कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस’ येथे रणनीतिक व्यवहारविषयक टाटा चेअर आणि वरिष्ठ फेलो म्हणून कार्यरत आहेत, तसेच ते आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि आशिया खंडावर विशेष लक्ष केंद्रित करून अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचे विशेषज्ञ आहेत.

अणुकरार वाटाघाटीत याेगदान

जर अ‍ॅश्ले यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर त्यांना १० वर्षाचा तुरूंगवास आणि २ लाख ५० हजार डॉलरचा दंड होऊ शकतो. दरम्यान, सरकारने ही तक्रार त्यांच्यावरील आरोप म्हणून पाहिले जातील. ते जोपर्यंत दोषी आढळत नाही तोपर्यंत त्यांना निर्दोष मानले जाईल असे स्पष्ट केले आहे. अमेरिका-भारत नागरी अणु कराराच्या वाटाघाटीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Maharashtra Rain : अतिवृष्टीग्रस्त २३ जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून मदत जाहीर; ३,२५८ कोटींची मंजूरी

मतदार यादीत गोंधळ! संभाजीनगरात ३६,००० डुप्लिकेट नावे; निवडणुका पुढे ढकला, विरोधी पक्षानंतर महायुतीच्या आमदाराची मागणी

Nandurbar : ऐन दिवाळीत भाविकांवर काळाचा घाला; चांदशैली घाटात भीषण अपघात, अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या ६ जणांचा मृत्यू

Pakistan-Afghanistan War : ३ खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; पाकिस्तानला मोठा फटका बसणार?

Pakistan-Afghanistan War : युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून हवाई हल्ला; अफगाणिस्तानच्या ३ खेळाडूंचा मृत्यू