आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानच्या बलुचिस्तानात चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर हल्ला ; 4 चिनी नागरिकांसह १३ जणांचा मृत्यू

या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीच्या आत्मघाती मजीद ब्रिगेडने स्वीकारली आहे. 'बीएलए'च्या म्हणण्यानुसार...

नवशक्ती Web Desk

पाकिस्तानच्या बलुचिस्तान येथील ग्वादरमद्ये झालेल्या हल्ल्यात चार चिनी नागरिकांसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात पाकिस्तानी लष्कराच्या चार जवानांचा देखील समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार बलुचिस्तान येथील ग्वादरमध्ये चिनी कामगारांवर झालेल्या आजच्या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीच्या आत्मघाती मजीद ब्रिगेडने स्वीकारली आहे. बीएलएच्या म्हणण्यानुसार त्यांच्या दोन मजीद ब्रिगेड 'फिदाईन'ने हल्ल्यात भाग घेतला होता.

या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सुरक्षा दलांकडून दोन कथिक हल्लेखोरांची छायाचित्रे जारी करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आज झालेल्या या हल्ल्यात १३ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. सकाळी साडेनऊ वाजेच्या सु्मारास चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला. यावेळी स्फोट आणि गोळीबाराच्या आवाजामुळे येथील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.

दरम्यान, बलुचिस्तानच्या ग्वादरमध्ये झालेल्या हल्ल्याला सरकारी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. ग्वादरच्या फकीर कॉलनीजवळ हा हल्ला करण्यात आला आहेत. पाकिस्तानमधील चिनी वाणिज्य दूतावासांनी बलुचिस्तान आणि सिंधमधील आपल्या नागरिकांना पुढील आदेश येईपर्यंत घरातचं राहण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप