आंतरराष्ट्रीय

BLA ने जारी केला पाकिस्तानी लष्करावरील आत्मघातकी हल्ल्याचा Video, ५ ठार

क्वेटाहून कफ्तानला जाणाऱ्या ८ लष्करी वाहनांवर नोशकी येथील महामार्गावर आत्मघातकी हल्ला झाला.

Krantee V. Kale

इस्लामाबाद : बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) रविवारी पाकिस्तानी लष्करावर आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात तीन पाक लष्कराचे जवान व अन्य दोघे जण ठार झाले. क्वेटाहून कफ्तानला जाणाऱ्या ८ लष्करी वाहनांवर नोशकी येथील महामार्गावर आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात ९० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा ‘बीएलए’ने केला आहे.

‘बीएलए’च्या माहितीनुसार, त्यांच्या मजीद आणि फतेह ब्रिगेडने लष्कराच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला. आत्मघातकी हल्लेखोरांची गाडी लष्कराच्या ताफ्यावर धडकली. त्यानंतर फतेह पथकाने लष्कराच्या ताफ्यात घुसून हल्ला केला. ज्या वाहनावर हल्ला केला, ते पूर्णपणे उद‌्ध्वस्त झाले. जखमींना नोशकी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या भागात आता आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

पाकिस्तानी पोलिसांनी सांगितले की, रस्त्यावर पडलेल्या एका बॉम्बचा स्फोट झाला. त्यात सैनिकांना घेऊन जाणारी बस बळी ठरली. त्यात ३ पाकिस्तानी सैनिक व अन्य दोन जण मारले गेले, तर १० जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

‘बीएलए’ने ५ दिवसांपूर्वी प्रवासी ट्रेनचे अपहरण केले होते. त्यातील २१४ पाकिस्तानी लष्कराशी संबंधितांना ठार केल्याचा दावा ‘बीएलए’ने केला होता.

सोशल मीडिया धोरण लवकरच; अल्पवयीन मुलांच्या वापरावर आणणार नियंत्रण; माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांची माहिती

लष्करी सेवेतील महिलांवरचा भेदभाव झाला दूर; स्थायी सेवा नाकारलेल्यांनाही पेन्शन मिळणार

ED कडे होती धनखड यांची फाइल; नव्या पुस्तकात संजय राऊत यांचा दावा

अजित पवार अपघातप्रकरणी कर्नाटकात FIR; आमदार रोहित पवार यांची माहिती

उद्धव यांची 'बात' आणि देवेंद्रांचा 'हात'; 'निरोपा'च्या निमित्ताने आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये रंगली जुगलबंदी; विधान परिषदेत ९ सदस्यांना निरोप