Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका

'लहरा दो तिरंगा' मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंडी हाऊस परिसरातून ताब्यात घेण्यात आलेल्या AISA च्या अध्यक्षा नेहा बोरा यांची शनिवारी पहाटे सुटका करण्यात आली.
Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका
Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका
Published on: 

नवी दिल्ली : दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये आयोजित 'लहरा दो तिरंगा' मोर्चापूर्वी दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घेतले. त्यांना आज शनिवारी (दि. १७) विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) अध्यक्षा नेहा बोरा यांची शनिवारी पहाटे सुटका करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) विरोधात आयोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका
CJP Protest : सीजेपी नेत्यांना ताब्यात घेणे म्हणजे ‘अपहरण’ - अभिजीत दिपके

मोर्चापूर्वीच दिपके यांच्यावर कारवाई

कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये आयोजित मोर्चात सहभागी होण्यासाठी अभिजीत दिपके हे करोल बागमधील झंडेवाला परिसरातील निवासस्थानातून बाहेर पडले होते. मात्र, मोर्चाला सुरुवात होण्याच्या काही मिनिटे आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १२६ आणि १७० अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. शांतता राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि संभाव्य दखलपात्र गुन्हा रोखण्यासाठी कारवाई करणे, या तरतुदींचा या प्रकरणात आधार घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका
Lehra Do Tiranga Campaign : दीपके, नेहा स्थानबद्ध; ‘लहरा दो तिरंगा’ मोर्च्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई

यापूर्वीही विमानातून घेतले होते ताब्यात

यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी जंतर-मंतर येथे CJP च्या नियोजित आंदोलनापूर्वी अभिजीत दिपके यांच्यासह पक्षाचे सदस्य सौरव दास आणि आशुतोष रांका यांना मुंबईहून विमानाने दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांना विमानातूनच ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर शांतता राखण्याच्या हमीपत्रावर त्यांची सुटका करण्यात आली होती.

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका
मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीला सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पुन्हा अटक करण्यात आली. हमीपत्रातील अटींचे उल्लंघन, अनधिकृत प्रवेश आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्यासह विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.

दास आणि रांका हे अन्य १२ समर्थकांसह जंतर-मंतर येथे पोहोचले होते. तेथे त्यांनी राष्ट्रध्वज फडकावला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. सध्या दोघांनाही तिहार कारागृहातील अतिसुरक्षित तुरुंगात ठेवण्यात आल्याची माहिती आहे. CJP चे आणखी एक सदस्य अजिंक्य शिंदे यांच्यावरही शांतता राखण्याच्या हमीपत्रासंदर्भात कारवाई करण्यात आली होती.

नेहा बोरा यांची पहाटे सुटका

'लहरा दो तिरंगा' मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंडी हाऊस परिसरातून ताब्यात घेण्यात आलेल्या AISA च्या अध्यक्षा नेहा बोरा यांची शनिवारी पहाटे सुटका करण्यात आली. दिल्ली पोलीस कायद्याच्या कलम ६५ अंतर्गत ताब्यात घेण्यासंबंधीच्या औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मात्र, नेहा बोरा यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर AISA ने आक्षेप घेतला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, बोरा यांना ताब्यात घेतल्यानंतर जवळपास पाच तास दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आले. त्यानंतर त्यांना आर. के. पुरम पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या वकिलांनाही नेहा बोरा यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.

दरम्यान, नेहा बोरा यांची सुटका झाली असली, तरी अभिजीत दीपके यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पुढे काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. CJP आणि AISA कडून SIR विरोधातील आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका मांडण्यात आली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in