प्रातिनिधिक प्रतिमा
आंतरराष्ट्रीय

ब्रह्मपुत्रेवरील मेगा-धरणाच्या सुरक्षेची चीनी भूगर्भशास्त्रज्ञांना चिंता

तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीवरील जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाच्या खाली असलेल्या एका सक्रिय भूकंपप्रवण रेषेमुळे त्याच्या संरचनेच्या स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो, असे चिनी भूगर्भशास्त्रज्ञांच्या एका अभ्यासात समोर आले आहे. यामुळे या प्रदेशातील आपत्ती रोखण्यासाठी हे धरण मदत करेल, या चीन सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Swapnil S

बीजिंग: तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीवरील जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाच्या खाली असलेल्या एका सक्रिय भूकंपप्रवण रेषेमुळे त्याच्या संरचनेच्या स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो, असे चिनी भूगर्भशास्त्रज्ञांच्या एका अभ्यासात समोर आले आहे. यामुळे या प्रदेशातील आपत्ती रोखण्यासाठी हे धरण मदत करेल, या चीन सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वैज्ञानिकांनी सांगितले की, पूर्व हिमालयीन प्रदेशात पृथ्वीच्या कवचाला पडलेल्या भेगेमुळे या अवाढव्य जलविद्युत प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांच्या रचनात्मक अखंडतेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.

गेल्या महिन्यात ‘सेडिमेंटरी जिओलॉजी अँड टेथियन जिओलॉजी’ या चिनी भाषेतील नियतकालिकात प्रकाशित झालेल्या संशोधन पत्रिकेत संशोधकांनी म्हटले आहे की, पायझेन फॉल्ट, जो प्लिस्टोसीन किंवा हिमयुगापासून अत्यंत सक्रिय आहे. त्याचा ‘धरणे, रस्ते, पूल आणि बोगदे यांसारख्या जवळच्या संरचनांच्या बांधकामावर आणि रचनात्मक स्थिरतेवर तसेच जलाशय क्षेत्रावर मोठा प्रभाव पडेल.’ हा अभ्यास सरकारी मालकीच्या ‘चायना जिओलॉजिकल सर्व्हे’च्या देखरेखीखाली करण्यात आला होता. संशोधकांच्या मते, दीर्घकाळ चाललेल्या फॉल्टच्या हालचालींमुळे आजूबाजूचे खडक फुटले असून ते कमकुवत झाले आहेत. यामुळे जवळच्या अभियांत्रिकी प्रकल्पांचा पाया आणि रचनात्मक स्थिरता हानी पोहोचण्याबाबत अधिक संवेदनशील बनली आहे.

शोधनिबंधात म्हटले आहे की, ‘पायझेन क्षेत्र हे यार्लुंग त्सांगपोच्या (चीनी भाषेत ब्रह्मपुत्रा) खालच्या प्रवाहातील जलविद्युत केंद्राच्या जलाशय क्षेत्रात स्थित आहे.

चीनने गेल्या जुलै महिन्यात तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर १६७.८ अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्चाच्या धरणाचे बांधकाम अधिकृतपणे सुरू केले. दरवर्षी ३०० अब्ज किलोवॉट पेक्षा जास्त विजेची निर्मिती करणे अपेक्षित असलेले हे धरण ३० कोटींहून अधिक लोकांची वार्षिक विजेची गरज पूर्ण करेल असा अंदाज आहे.

हे धरण हिमालयातील एका महाकाय घळीमध्ये बांधले जात आहे, जिथे ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात आणि नंतर बांगलादेशात वाहण्यापूर्वी तीव्र ‘यू-टर्न’ (वळण) घेते.

हा प्रकल्प ज्या ठिकाणी आहे ती जागा वारंवार भूकंप अनुभवणाऱ्या टेक्टोनिक प्लेटच्या सीमेवर असल्याने, प्रचंड अभियांत्रिकी आव्हाने असूनही चीनने या प्रकल्पाचे काम पुढे नेले.

जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे तिबेटचे पठार, त्याच्या खालील टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे वेळोवेळी येणाऱ्या भूकंपांसाठी संवेदनशील आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये, चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, सीमापार नद्यांचा विकास करण्याबाबत चीन अत्यंत जबाबदार आहे आणि जलविद्युत प्रकल्प बांधण्याचा देशाला मोठा अनुभव आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

एसआयटी चौकशी; MPSC परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा, विद्यार्थ्यांसोबत केली ‘परीक्षा पे चर्चा’

MPSC Exam Postponed : हिवाळी अधिवेशनाचा ‘अडथळा’; गट-क परीक्षा पुढे

६२५ जण मंत्रालयातून ‘बाहेर’; ओएसडी ते शिपाई आपापल्या मूळ विभागात परत

Mumbai : रात्रीस ‘बेस्ट’ चाले... ; गणेश भक्तांसाठी रात्रभर ‘बेस्ट सेवा’

वीज कंपन्यांचे खासगीकरण नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस