आंतरराष्ट्रीय

‘ब्रेन रॉट’ ठरला ऑक्सफर्ड डिक्शनरीचा सर्वोत्कृष्ट शब्द; मोबाईलच्या अतिवापराची सवय म्हणजेच ‘ब्रेन रॉट’

लहान मुले जेवत नाहीत, आई त्याच्या हातात मोबाईल देते. वेळ जात नाही? मोठी माणसे मोबाईल चाळत बसतात... शाळकरी मुले, कॉलेजचे विद्यार्थी सतत मोबाईलवर गेम खेळत बसतात. घरी, ऑफिसमध्ये प्रत्येक जण मोबाईलमध्ये घुसलेला आहे. तास‌न‌्तास मोबाईलवर व्हिडीओ पाहणे, रील्स पाहत राहण्याची सवय म्हणजेच ‘ब्रेन रॉट’ हा धोकादायक प्रकार आहे.

Swapnil S

लंडन : लहान मुले जेवत नाहीत, आई त्याच्या हातात मोबाईल देते. वेळ जात नाही? मोठी माणसे मोबाईल चाळत बसतात... शाळकरी मुले, कॉलेजचे विद्यार्थी सतत मोबाईलवर गेम खेळत बसतात. घरी, ऑफिसमध्ये प्रत्येक जण मोबाईलमध्ये घुसलेला आहे. तास‌न‌्तास मोबाईलवर व्हिडीओ पाहणे, रील्स पाहत राहण्याची सवय म्हणजेच ‘ब्रेन रॉट’ हा धोकादायक प्रकार आहे.

जगातील बहुसंख्य लोक ‘एक्स’, टिकटॉक, इन्स्टाग्राम, फेसबुक आदी सोशल मीडियावर तासन‌्सात घालवत असतात. गरज नसतानाही असंख्य लोक सतत मोबाईलवर व्हिडीओ बघत बसतात. वेळ जात नसताना स्क्रोलिंग करतात. सतत मोबाईलशी चाळा केला जातो. याच धोकादायक सवयीला ‘ब्रेन रॉट’ म्हटले जाते. या सवयीमुळे आपली बौद्धिक क्षमता हळूहळू नष्ट होते. याच ‘ब्रेन रॉट’ला ऑक्सफर्ड डिक्शनरीने २०२४ चा सर्वोत्कृष्ट शब्द म्हणून घोषित केले आहे.

‘ब्रेन रॉट’ या शब्दाचा वापर २०२३ ते २०२४ दरम्यान २३० पट वाढला. तासन् तास रील्स बघितल्याने आपल्याला ‘ब्रेन रॉट’ ही सवय लागते. ही सवय आपल्याला मानसिकदृष्ट्या कमकुवत करते आणि आपली बौद्धिक क्षमता नष्ट करते.

‘ब्रेन रॉट’ची चर्चा का?

या शब्दाची उत्पत्ती जुनी आहे. १८५४ मध्ये हेन्री थोरो या लेखकाने आपल्या ‘वाल्डेन’ पुस्तकात याची माहिती दिली. मानसिक व बौद्धिक आळस या अर्थाने हा शब्द वापरण्यात आला. सध्या सोशल मीडियावर गरज नसताना बघितल्या जाणाऱ्या व्हिडीओ किंवा रील्सच्या सवयीसाठी हा शब्द वापरला जातो.

‘ब्रेन रॉट’ किती धोकादायक ?

‘ब्रेन रॉट’मुळे आपण आपली बौद्धिक क्षमता सातत्याने कमी करत आहोत. आपल्या मेंदूवर त्याचा भीषण गंभीर परिणाम होत आहे. काही आई-वडील आपल्या मुलाला सतत व्यस्त ठेवण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल देतात. काही दिवसांतच त्या मुलाला मोबाईल गरजेचा बनतो. त्यांना मोबाईल न मिळाल्यास ते जेवत नाहीत, चित्रविचित्र वागतात. ते हिंसक बनतात. मोबाईलवरील घाणेरड्या व्हिडीओमुळे लहान मुलांच्या कोवळ्या मेंदूवर दीर्घकाळ परिणाम होतो. ते मोबाईलवरील काल्पनिक जीवनाला खरे मानतात. वास्तविक जीवनात ते काल्पनिक जीवनासारखे वागायला बघतात. ही बाब अत्यंत धोकादायक आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली