आंतरराष्ट्रीय

तैवानी उपाध्यक्षांच्या अमेरिका भेटीवरून चीनचा संताप

तैवानमध्ये पुढील वर्षी अध्यक्षीय निवडणुका होत असून विल्यम लाई हे त्यातील आघाडीचे उमेदवार मानले जात आहेत

नवशक्ती Web Desk

तैपेई : तैवानचे उपाध्यक्ष विल्यम लाई यांच्या अमेरिका भेटीवरून चीनने संताप व्यक्त केला असून तैवानला गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे.

वास्तविक, तैवानचे उपाध्यक्ष विल्यम लाई दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे या देशात नवनियुक्त अध्यक्ष सँटियागो पेना यांच्या शपथविधीसाठी जात आहेत. त्यांची अमेरिका भेट अधिकृत नाही. पॅराग्वेला जाताना वाटेत ते अमेरिकेत थांबले आहेत. मात्र, चीनने तेवढ्यावरूनही आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे. तैवानच्या उपाध्यक्षांच्या अमेरिका भेटीवर चीन बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याबद्दल चीन निर्धारपूर्वक आणि कठोर कारवाई करेल, असा इशारा चीनने तैवानला दिला आहे. तैवानमध्ये पुढील वर्षी अध्यक्षीय निवडणुका होत असून विल्यम लाई हे त्यातील आघाडीचे उमेदवार मानले जात आहेत.

जलसंधारण, चारा उपलब्धतेवर भर; ३०४ तालुक्यांना दिलासा मिळणार, दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

भाईंंदरमध्ये शेअर रिक्षांची मनमानी भाडेवाढ, प्रवाशांची लूट; १२ रुपयांवरून थेट १५ रुपये भाडे; RTO, पोलीस आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Mumbai : भाभा रुग्णालयात BMC चे पहिले बीएस्सी नर्सिंग कॉलेज

आरोग्य संस्थांवर AI ची नजर; कोल्हापुरात राज्यातील पहिला आरोग्य प्रकल्प, आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन

महाराष्ट्र कायम अव्वल राहणार; MIDC चे सीईओ दीपेंद्र कुशवाह यांचे प्रतिपादन; एआय, डेटा सेंटर आणि उत्पादनांच्या क्षेत्रात प्रचंड संधी