चीनमध्ये वेगवान रेल्वेचा विश्वविक्रम; अवघ्या दोन सेकंदात ७०० किमी/प्रतितास चाचणी यशस्वी प्रातिनिधिक छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

चीनमध्ये वेगवान रेल्वेचा विश्वविक्रम; अवघ्या दोन सेकंदात ७०० किमी/प्रतितास चाचणी यशस्वी

चीनमध्ये वेगवान रेल्वेने अवघ्या दोन सेकंदात ७०० किमीचा पल्ला प्रतितास गाठण्याचा विश्वविक्रम नोंदविला असून त्यासंबंधीची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. चीनने मॅग्नेटिक लेव्हिटेशन (मॅग्लेव्ह) तंत्रज्ञानात जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

Swapnil S

बीजिंग: चीनमध्ये वेगवान रेल्वेने अवघ्या दोन सेकंदात ७०० किमीचा पल्ला प्रतितास गाठण्याचा विश्वविक्रम नोंदविला असून त्यासंबंधीची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. चीनने मॅग्नेटिक लेव्हिटेशन (मॅग्लेव्ह) तंत्रज्ञानात जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. ही मॅग्लेव्ह ट्रेन ४०० मीटर (१,३१० फूट) लांबीच्या मॅग्नेटिक लेव्हिटेशन चाचणी मार्गावर घेण्यात आली. विशेष म्हणजे या चाचणीनंतर ती तितक्याच वेगात सुरक्षितरीत्या थांबवण्यात आली, असे वृत्त साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने (एससीएमपी) दिले आहे.

या रेल्वे चाचणीचा व्हिडीओ चीनच्या सरकारी प्रसारक सीसीटीव्हीने गुरुवारी जारी केला. त्यामध्ये चेसिससारखे दिसणारे वाहन मॅग्लेव्ह मार्गावर क्षणात झेपावताना दिसते, असे एससीएमपीने म्हटले आहे. या रेल्वेने अतिशय तीव्र वेगाने गती घेतली आणि मार्गाच्या शेवटी झटपट थांबत धुराची लकेर तिने मागे सोडली.

सीसीटीव्हीच्या अहवालानुसार, ही चाचणी अत्यंत वेगवान गती साध्य करणे आणि उच्च क्षमतेचे नियंत्रण राखणे या दृष्टीने महत्त्वाची ठरली. याशिवाय, "अत्युच्च वेगासाठी विद्युतचुंबकीय प्रपल्शन, इलेक्ट्रिक सस्पेन्शन मार्गदर्शन, क्षणिक उच्च-शक्ती ऊर्जा साठवण उलटसुलट प्रक्रिया आणि उच्च-क्षेत्र सुपरकंडक्टिंग मॅग्नेट्स" अशा मुख्य तांत्रिक आव्हानांचेही निराकरण करण्यात आले आहे.

या चाचणीमुळे चीनने अतिउच्च वेगाच्या मॅग्लेव्ह तंत्रज्ञानात जागतिक अव्वल पातळीवर प्रवेश केल्याचे संकेत मिळाले असून, देशात व्हॅक्युम पाइपलाइन मॅग्लेव्ह किंवा 'हायपरलूप' वाहतुकीच्या अधिक शक्यताही खुल्या झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मॅग्लेव्ह तंत्रज्ञानात, गाडीवरील चुंबक पाइपच्या बाजूला असलेल्या धातूसोबत परस्परसंवाद साधून गाडीला हवेत तरंगत ठेवतात आणि पुढे ढकलतात. द सनच्या अहवालानुसार, मॅग्नेटिक लेव्हिटेशन - म्हणजेच मॅग्लेव्ह - यामध्ये कमी दाबाच्या (लो-व्हॅक्युम) पाइपमध्ये सुपरकंडक्टिंग मॅग्नेट्सचा वापर करून चुंबकीय क्षेत्र अधिक मजबूत केले जाते.

सरासरी वेग

या वाहनाने गाठलेला वेग हा एक नवा टप्पा ठरला असून, आजपर्यंतची ही जगातील सर्वात वेगवान सुपरकंडक्टिंग इलेक्ट्रिक मॅग्लेव्ह असल्याचे सांगितले जात आहे. साधारणपणे चीनमधील उच्चगती गाड्या सुमारे २१७ मैल प्रतितास वेगाने धावतात आणि लांब बोगद्यांमध्येही ५ जी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देतात, तर दीर्घ पल्ल्याच्या व्यावसायिक प्रवासी विमानांचा सरासरी वेग साधारणतः ५४७ ते ५७५ मैल प्रतितास इतका असतो.

पुण्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी; निवडणुकीच्या युती-आघाड्यांची नव्याने मांडणी

BMC Election : महायुतीचे २०७ जागांवर एकमत, २० जागांवर चर्चा सुरू

आरोपी बंडू आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात; हातात बेड्या, गळ्यात दोरखंड, घोषणाबाजी करत अर्ज भरायला गेला, पण...

पोटच्या मुलांनीच केला आई-वडिलांचा खून; जवळा मुरार येथील घटनेचा उलगडा; आर्थिक नैराश्यातून टोकाचे पाऊल

भीमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद; ९ जानेवारीपासून अंमलबजावणी