आंतरराष्ट्रीय

अमेरिकेच्या १०० टक्के टॅरिफला चीनचे चोख प्रत्युत्तर

"ट्रम्प यांच्या या कृतींमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील हितसंबंधांना गंभीर नुकसान होत आहे. द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापार चर्चेसाठीचे वातावरण बिघडत आहे. चीन लढू इच्छित नाही, परंतु लढण्यास घाबरत नाही आणि गरज पडल्यास तो प्रत्युत्तर देईल,” असे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Swapnil S

बीजिंग: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १०० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता चीननेही अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. "ट्रम्प यांच्या या कृतींमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील हितसंबंधांना गंभीर नुकसान होत आहे. द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापार चर्चेसाठीचे वातावरण बिघडत आहे. चीन लढू इच्छित नाही, परंतु लढण्यास घाबरत नाही आणि गरज पडल्यास तो प्रत्युत्तर देईल,” असे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

१ नोव्हेंबरपासून चिनी वस्तूंवर अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ आकारले जाणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. याबरोबरच अमेरिकन बनावटीच्या सॉफ्टवेअरच्या निर्यातीवर कडक नियंत्रण ठेवले जाणार आहे. यावर चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले की, “अमेरिकेने चीनवर वारंवार नवीन निर्बंध लादले आहेत. निर्यात नियंत्रण आणि प्रतिबंधित यादीत अनेक चिनी कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक वेळी उच्च शुल्क लादण्याची धमकी देणे, हा चीनशी वाटाघाटी करण्याचा योग्य मार्ग नाही. आम्ही अमेरिकेला त्यांचे चुकीचे निर्णय त्वरित दुरूस्त करण्याचे आणि दोन्ही देशांमध्ये स्थिर, विकासात्मक आर्थिक व्यापार संबंध राखण्याचे आवाहन करतो.”

अमेरिकेशी संबंधित जहाजांवर विशेष बंदर शुल्क आकारले जाईल. अमेरिकेच्या नवीन शुल्कांवर प्रतिक्रिया म्हणून हे पाऊल आवश्यक असल्याचे चीनने म्हटले आहे. जर अमेरिका आपल्या भूमिकेवर कायम राहिला, तर चीन आपले कायदेशीर हक्क आणि हितसंबंध जपण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा वाणिज्य मंत्रालयाने दिला आहे.

ट्रम्प - जिनपिंग भेटीबाबत संदिग्धता

दरम्यान, दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असताना डोनाल्ड ट्रम्प हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार होते. मात्र, त्याआधीच चीनवर १०० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केल्यामुळे या भेटीबाबत संदिग्धता व्यक्त केली जात आहे.

मुंबईकरांनो लक्ष द्या! पांजरापूर पंपिंग स्टेशनमध्ये ‘तांत्रिक बिघाड’; पाणी जपून वापरण्याचे BMC चे आवाहन

विरारमध्ये ‘वचनपूर्ती जल उत्सव’ कार्यक्रमासाठी रस्ता अडवल्याने गोंधळ; भाजप, बविआ आणि नागरिकांमध्ये संघर्ष

Mumbai : खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड; तातडीने रुग्णालयात दाखल

Thane News : कबूतराला वाचवायला गेला, अग्निशामक जवानाने जीव गमावला; २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, परिसरात हळहळ

बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव कुटुंबाला मोठा धक्का; IRCTC घोटाळा प्रकरणी आरोप निश्चित, RJD समोर दुहेरी संकट