आंतरराष्ट्रीय

चारबहार बंदर प्रकल्पावर चर्चा; परराष्ट्र मंत्री जयशंकर इराण दौऱ्यावर

जयशंकर यांच्या इराण दौऱ्यात या प्रकल्पाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Swapnil S

तेहरान : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या इराणच्या दौऱ्यावर गेले असून सोमवारी त्यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीराब्दुल्लाहियान यांची भेट घेऊन सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या चाबहार बंदर प्रकल्पावर सविस्तर चर्चा केली. तसेच इराणमार्गे भारत आणि युरोपला जोडणाऱ्या इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (आयएनएसटीसी) प्रकल्पासंदर्भात दीर्घकालीन करार करण्यावरही वाटाघाटी केल्या.

जयशंकर यांनी सोमवारी इराणचे अध्यक्ष डॉ. इब्राहीम रईसी, परराष्ट्र मंत्री हुसेन अमीराब्दुल्लाहियान, रस्ते आणि शहरी विकास मंत्री मेहरदाद बजरपाश यांच्या भेटी घेऊन 'आयएनएसटीसी' प्रकल्पाच्या प्रगतीवर चर्चा केली. इराणमधील चाबहार बंदर या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. हमास-इस्रायल युद्धामुळे तांबड्या समुद्रात येमेनमधील हुथी बंडखोरांनी विविध देशांच्या व्यापारी जहाजांवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक कंपन्यांनी तांबडा समुद्र आणि सुएझ कालव्यामार्गे वाहतूक बंद केली असून आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला (केप ऑफ गुड होप) वळसा घालून जहाजे युरोपमधून आशियात येत आहेत. हा प्रकार वेळ आणि खर्च वाढवणारा आहे. भारताने इस्रायलमधील हैफा बंदरामार्गे युरोपपर्यंत जाण्याच्या कॉरिडॉरचा नुकताच प्रस्ताव मांडला होता. पण त्या प्रदेशात गेल्या काही दिवसांतील हिंसक घडामोडींमुळे तो प्रकल्प तूर्तास पूर्ण होणे अवघड आहे. त्यामुळे इराणच्या चाबहार बंदरामार्गे युरोपला जोडणाऱ्या 'आयएनएसटीसी' प्रकल्पाला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे. जयशंकर यांच्या इराण दौऱ्यात या प्रकल्पाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

'आयएनएसटीसी'त चाबहारचे स्थान महत्त्वाचे

इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (आयएनएसटीसी) हा भारत, इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोपमधील मालवाहतुकीसाठी ७२०० किमी लांबीचा वाहतूक प्रकल्प आहे. इराणच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात वसलेल्या चाबहार बंदराकडे या प्रकल्पाचे प्रमुख केंद्र म्हणून पाहिले जाते. २०२१ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या कनेक्टिव्हिटी कॉन्फरन्समध्ये जयशंकर यांनी चाबहार बंदर हे अफगाणिस्तानसह प्रमुख प्रादेशिक ट्रान्झिट हब म्हणून विकसित करण्यावर भर दिला. प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी आणि अफगाणिस्तानशी संपर्क साधण्यासाठी भारत चाबहार बंदर प्रकल्पावर भर देत आहे.

राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर होण्याची शक्यता; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

जामीन अर्जांच्या सुनावणीत चालढकल खपवून घेणार नाही; कोर्टाला सहकार्य करण्याचे निर्देश; उच्च न्यायालयाची कठोर भूमिका

मराठा समाजबांधवांना तात्पुरता दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधात सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार