Iran vs US-Israel War : इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळला 
आंतरराष्ट्रीय

Iran vs US-Israel War : इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळला

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने युद्धविरामासाठी विनंती केल्याचा दावा केला होता.

Swapnil S

दुबई :अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने युद्धविरामासाठी विनंती केल्याचा दावा केला होता. मात्र, इराणने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून ट्रम्प यांचे विधान 'खोटे आणि निराधार' असल्याचे म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रत्युत्तर

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी बुधवारी स्पष्ट केले की, इराणने अमेरिकेकडे कोणत्याही प्रकारच्या युद्धविरामाची मागणी केलेली नाही. ट्रम्प यांनी केलेले विधान जाणीवपूर्वक पसरवलेली अफवा असल्याचे त्यांनी सूचित केले.

क्रांतिकारी दलाचा इशारा

दुसरीकडे, इराणच्या निमलष्करी 'रिव्होल्युशनरी गार्ड'ने (आयआरजीसी) या संदर्भात एक स्वतंत्र पत्रक प्रसिद्ध केले आहे. जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'वर आपलेच वर्चस्व असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे आणि निर्णायकपणे इराणच्या सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी मांडलेल्या या हास्यास्पद तमाशाच्या आधारे, ही सामुद्रधुनी राष्ट्राच्या शत्रूंसाठी कधीही उघडली जाणार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.

तणाव वाढण्याची शक्यता

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर इराणने दिलेल्या या आक्रमक प्रतिसादामुळे मध्य-पूर्वेतील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून इराणने दिलेला इशारा जागतिक तेल पुरवठ्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरू शकतो.

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार