अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प X/White House
आंतरराष्ट्रीय

डोनाल्ड ट्रम्प 'व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'; स्वतःच केले जाहीर; ट्रुथ सोशलवरील पोस्टने खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर स्वतःला थेट “व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष” असल्याचे जाहीर करणारी पोस्ट केल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.

Krantee V. Kale

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर स्वतःला थेट “व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष” असल्याचे जाहीर करणारी पोस्ट केल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. रविवारी केलेल्या या पोस्टमध्ये ट्रम्प यांचा अधिकृत फोटो असून त्याखाली “ “व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष, जानेवारी २०२६ पर्यंत पदावर (Acting President of Venezuela, Incumbent January 2026)” असा उल्लेख करण्यात आला आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख अमेरिकेचे ४५वे आणि ४७वे राष्ट्राध्यक्ष म्हणूनही केला असून, २० जानेवारी २०२५ रोजी पदभार स्वीकारल्याचे नमूद आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठी कारवाई करत देशाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतले होते. मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना न्यूयॉर्कला नेण्यात आले असून, त्यांच्यावर अंमली पदार्थ आणि दहशतवादाशी संबंधित कटाच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

“ तोपर्यंत व्हेनेझुएलाचे प्रशासन अमेरिका पाहणार”

“जोपर्यंत सुरक्षित, योग्य आणि सुव्यवस्थित सत्तांतर होत नाही, तोपर्यंत अमेरिका व्हेनेझुएलाचे प्रशासन पाहणार आहे. व्हेनेझुएलाच्या जनतेच्या हिताचा विचार न करणारा कोणीही सत्तेवर येऊ नये, असा धोका आम्ही पत्करू शकत नाही.” असे ट्रम्प यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

डेल्सी रोड्रिग्झ यांची अंतरिम राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती

दरम्यान, व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष आणि तेलमंत्री डेल्सी रोड्रिग्झ यांनी गेल्या आठवड्यातच देशाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. मात्र, ट्रम्प यांच्या दाव्यामुळे या सत्तांतराबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

३० ते ५० दशलक्ष बॅरल तेल अमेरिकेला देणार

याशिवाय, अंतरिम सरकारकडून ३० ते ५० दशलक्ष बॅरल ‘उच्च दर्जाचे, निर्बंधित तेल’ अमेरिकेला दिले जाणार आहे, असा दावाही ट्रम्प यांनी यापूर्वी केला आहे. “या तेलाच्या विक्रीतून मिळणारा पैसा माझ्या नियंत्रणाखाली राहील, जेणेकरून तो व्हेनेझुएला आणि अमेरिकेच्या जनतेच्या हितासाठी वापरला जाईल. या योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांना दिले आहेत. हे तेल साठवणूक जहाजांद्वारे अमेरिकेत आणून थेट तेथील बंदरांवर उतरवले जाणार, असे ट्रम्प यांनी याआधीच म्हटले आहे.

राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समितीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान

मतदार यादीत नाव सापडत नाहीये? BMC ने हेल्पलाईन क्रमांक केला जारी

Mumbai : ५ कोटींच्या खंडणीसाठी RTI कार्यकर्त्याची आंध्रच्या खासदाराला धमकी; पीएला चाकू दाखवत ७० हजारही लुटले, मुंबईतून अटक

'२५ वर्षे झाली, मला सोडा'; अबू सालेमच्या मागणीवर SC चा सवाल- २००५ पासून गणना कशी केली? नियमांबाबत स्पष्टीकरणही मागवले

KDMC Election : पुणेरी पाटी टाईप संदेशाने सर्वांचीच करमणूक; अख्ख्या बिल्डिंगचे मत केवळ यांनाच