भारत-पाक युद्ध थांबवले; ट्रम्प यांचा पुन्हा दावा X
आंतरराष्ट्रीय

भारत-पाक युद्ध थांबवले; ट्रम्प यांचा पुन्हा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा पुन्हा एकदा दावा केला आहे. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून आपण आठ युद्धे संपवली आहेत, असे त्यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितले.

Swapnil S

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा पुन्हा एकदा दावा केला आहे. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून आपण आठ युद्धे संपवली आहेत, असे त्यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितले.

ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना 'फंटास्टिक मॅन' म्हटले. त्यांनी १५० हून अधिक वेळा भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवण्याचे श्रेय घेतले आहे. मात्र, भारताने कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीचा इन्कार केला आहे.

ट्रम्प यांच्यानंतर बोलताना जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय म्हणाले की, इराण युद्धाने हे दाखवून दिले आहे की मध्य पूर्वेतील कोणताही संघर्ष या प्रदेशापुरता मर्यादित नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'वंदे मातरम्' न म्हणणाऱ्यांना शिक्षा नको; धार्मिक कारणास्तव 'वंदे मातरम्' नाकारणाऱ्यांना न्यायालयाचे घटनात्मक संरक्षण

मुख्यमंत्री आजपासून बांधावर! दुष्काळ पाहणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर; उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची घोषणा

परतीचा पाऊसही ठरणार अपुरा; दुष्काळाचे संकट अटळ, खरिपाच्या पिकांनाही फारसा दिलासा नाही

Mumbai : रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; धार्मिक उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही - हायकोर्ट

मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी