आंतरराष्ट्रीय

भारत आणि रशियाला आम्ही गमावले! ट्रम्प यांना उशिरा सुचले शहाणपण

भारत आणि रशिया या देशांना आम्ही चीनच्या हातात गमावले आहे. देव करो त्यांचे भविष्य समृद्ध होवो, असा नैराश्यपूर्ण सूर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आळवला आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : भारत आणि रशिया या देशांना आम्ही चीनच्या हातात गमावले आहे. देव करो त्यांचे भविष्य समृद्ध होवो, असा नैराश्यपूर्ण सूर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आळवला आहे.

शांघाय सहकार्य परिषदेचे छायाचित्र शेअर करीत समाज माध्यमावर त्यांनी याबाबत एक पोस्ट टाकली आहे. रशिया आणि भारत हे दोन मोठे देश चीनच्या बाजूने झुकलेले आहेत. ते पाहता अमेरिका आता या दोन्ही देशांसोबतचे संबंध संपवण्याच्या विचारात आहे, असे संकेत ट्रम्प यांच्या पोस्टने मिळत आहेत. ट्रम्प यांच्या पोस्टवर परराष्ट्र मंत्रालयाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशिया चीनच्या जवळ गेल्याने नाराजी व्यक्त केली आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीतील मोदी, पुतीन आणि जिनपिंग यांच्या भेटीचा फोटो शेअर करत त्यांनी दोन्ही देशांना गमावल्याचे म्हटले आहे.

मोदी, पुतिन यांचा चीन दौरा

'टॅरिफ' वरून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकन सरकारने भारतावर ५० टक्के टैरिफ लादला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे, तर रशियासोबत युक्रेन युद्धामुळे अमेरिकेचे संबंध ताणले गेलेले आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि मोदी यांनी याच महिन्याच्या सुरुवातीला चीनचा दौरा केला. चीन, रशिया आणि भारत अशा मोठ्या देशांचे प्रमुख 'एससीओ'च्या बैठकीत एकत्र आले. त्यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादला आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडले आहेत. अमेरिकेने भारतावर २५ टक्के बेस टॅरिफ लादला. त्यानंतर रशियन तेलाची आयात करत असल्याने २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादला. त्यामुळे एकूण टॅरिफ ५० टक्क्यांवर गेला. २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादत ट्रम्प प्रशासनाने भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

टॅरिफ उठवण्यासाठी अमेरिकेच्या ३ अटी

अमेरिकेचे उद्योग सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी २५% अतिरिक्त कर रद्द करण्यासाठी भारतावर तीन अटी घातल्या आहेत. ते म्हणाले की, भारताला रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे लागेल, ब्रिक्सपासून वेगळे व्हावे लागेल आणि अमेरिकेला पाठिंबा द्यावा लागेल.

मुंबईतील हॉटेल्स, बार, बेकऱ्या FDA च्या रडारवर; ख्रिसमस-नववर्षाच्या तोंडावर तपासणी मोहीम

मुंबईच्या हवा गुणवत्तेसाठी 'मानस'ची निर्मिती; IIT Kanpur च्या सहकार्याने BMC राबवणार प्रकल्प

Mumbai : 'कूपर'मध्ये बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांत वाढ; नातेवाईकांकडून सुरक्षेची मागणी

Thane RTO : वाहनधारकांनो तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली? 'डेडलाईन' जारी; त्वरित ऑनलाइन अर्जाद्वारे अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन

"सरकारचे प्राधान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला नाही तर...; सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका