संग्रहित छायाचित्र  
आंतरराष्ट्रीय

भारताकडून ‘शून्य’ कराची ऑफर, आता वेळ निघून गेली; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

शांघाय सहकार्य परिषदेत भारत-चीन-रशिया हे बडे देश एकत्रित झाल्याने अमेरिकेचा तीळपापड झाला आहे. ही परिषद संपल्यानंतर तात्काळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली. भारताने आता आपले शुल्क (टॅरिफ) शून्यावर आणण्याची ‘ऑफर’ दिली पण ‘आता खूप उशीर झाला आहे.’ असे ट्रम्प यांनी सांगितले.

Swapnil S

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन: शांघाय सहकार्य परिषदेत भारत-चीन-रशिया हे बडे देश एकत्रित झाल्याने अमेरिकेचा तीळपापड झाला आहे. ही परिषद संपल्यानंतर तात्काळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली. भारताने आता आपले शुल्क (टॅरिफ) शून्यावर आणण्याची ‘ऑफर’ दिली पण ‘आता खूप उशीर झाला आहे.’ असे ट्रम्प यांनी सांगितले. भारत आपले बहुतांश तेल व लष्करी उत्पादने रशियाकडून विकत घेतो आणि अमेरिकेकडून फारच कमी घेतो, अशी चीडचीड त्यांनी व्यक्त केली.

‘ट्रुथ सोशल’ या व्यासपीठावर ट्रम्प म्हणाले की, ‘ थोड्या लोकांना हे माहित आहे की आमचे भारताशी फारसे व्यापार संबंध नाहीत. पण भारत आमच्यासोबत प्रचंड प्रमाणात व्यापार करतो. भारत अमेरिकेला, जो त्याचा सर्वात मोठा 'ग्राहक' आहे, प्रचंड प्रमाणात वस्तू विकतो. पण आम्ही भारताला फारच कमी वस्तू विकतो. आतापर्यंत हा पूर्णपणे एकतर्फी संबंध राहिला आहे आणि तो अनेक दशकांपासून आहे, असे त्यांनी सांगितले.

भारताने आतापर्यंत अमेरिकेवर सर्वाधिक शुल्क लावले असल्याने आमची उत्पादने भारतात काही विकू शकत नाहीत. हा पूर्णपणे एकतर्फी व्यवहार ठरला आहे. तसेच, भारत रशियाकडून बहुतांश तेल व लष्करी उत्पादने विकत घेतो, अमेरिकेकडून फार कमी. त्यांनी आता शुल्क शून्यावर आणण्याची ऑफर दिली आहे, पण आता उशीर झाला आहे. हे त्यांनी अनेक वर्षांपूर्वी करायला हवे होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांच्या या वक्तव्यांचा संदर्भ असा की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिआंजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य परिषदेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.

ट्रम्प प्रशासनाने भारतावर २५ टक्के परस्पर शुल्क लावले होते. भारतावर रशियन तेल खरेदीसाठी अतिरिक्त २५ टक्के शुल्क लावले. त्यामुळे भारतावर एकूण ५० टक्के शुल्क लागू झाले. अमेरिकेकडून भारतावर सर्वाधिक शुल्क आहे.

पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की, ते शेतकरी, पशुपालक, लघुउद्योग यांच्या हिताशी तडजोड करू शकत नाहीत. "आमच्यावर दबाव वाढेल, पण आम्ही तो सहन करू," असे त्यांनी सांगितले होते.

भारताने अमेरिकेने लावलेले शुल्क "अन्याय्य व अवाजवी" असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेसारखेच ती आपले राष्ट्रीय हित व आर्थिक सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलणार आहे.

२४ तासांत आंदोलकांना हटवा! मुंबई उच्च न्यायालयाचा जरांगे यांना अल्टिमेटम; आझाद मैदानात फक्त पाच हजार आंदोलकांना परवानगी

सुहाना खानच्या अडचणी वाढणार? शेतजमीन खरेदीवर वाद; अटींचा भंग केल्याचा आरोप; महसूल विभागाकडून चौकशी सुरू

Maratha Reservation : आंदोलनाला ‘खेळकर’ रंग; आंदोलकांचे मुंबईत क्रिकेट, कबड्डी, खो-खो

पुण्याहून आझाद मैदानाकडे निघालेल्या मराठा बांधवांवर पनवेलमध्ये किरकोळ कारणावरून हल्ला; ५ जण जखमी, दोघांना अटक

मत चोरीच्या अणुबॉम्बनंतर आता हायड्रोजन बॉम्ब येणार; मोदींना चेहरा लपविण्यासाठीही जागा मिळणार नाही; राहुल गांधींचा मोठा इशारा