ट्रम्प यांचा नेतान्याहू यांच्यावर निशाणा; अमेरिका-इस्रायल संबंधांमध्ये तणाव 
आंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांचा नेतान्याहू यांच्यावर निशाणा; अमेरिका-इस्रायल संबंधांमध्ये तणाव

इराणसोबत सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका महत्त्वपूर्ण कराराला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्यांनी इस्राएलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर जाहीरपणे अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. आजवर कोणत्याही अमेरिकन नेत्याने इस्रायलच्या पंतप्रधानांविरुद्ध जाहीरपणे अशी भाषा वापरलेली नाही.

Swapnil S

वाशिंग्टन : इराणसोबत सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका महत्त्वपूर्ण कराराला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्यांनी इस्राएलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर जाहीरपणे अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. आजवर कोणत्याही अमेरिकन नेत्याने इस्रायलच्या पंतप्रधानांविरुद्ध जाहीरपणे अशी भाषा वापरलेली नाही.

बेंजामिन नेतान्याहू यांनी गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गौरव करताना, ‘इस्रायलला व्हाईट हाऊसमध्ये मिळालेला आजवरचा सर्वात मोठा मित्र,’ अशा शब्दांत कौतुक केले होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. ट्रम्प यांनी इस्रायलच्या अस्तित्वाचे श्रेय स्वतःकडे घेताना म्हटले की, मी नसतो तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते. एवढेच नव्हे तर, विविध मुलाखतींमध्ये त्यांनी नेतान्याहू यांच्या निर्णयांवर कडाडून टीका करत त्यांना ‘वेडा’ असेही संबोधले.

नेतान्याहू यांच्या कार्यकाळात अमेरिकेत चार अध्यक्ष बदलले असून त्यांनी प्रत्येकालाच कधी ना कधी नाराज केले आहे. परंतु, ट्रम्प यांच्याइतके जाहीरपणे कोणाचेही मतभेद समोर आले नव्हते; विशेष म्हणजे ट्रम्प यांनीच आपल्या कार्यकाळात नेतान्याहू यांच्यासोबत मिळून इराणविरोधातील आक्रमक भूमिका सुरू केली होती.

स्वित्झर्लंडमधील लुझर्न शहरानजीक बर्गनस्टॉक रिसॉर्टमध्ये शुक्रवारी या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत.

लेबनॉन हल्ल्यांमुळे ट्रम्प नाराज

अमेरिका आणि इराणदरम्यान सुरू असलेल्या शांतता वाटाघाटींना इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या ताज्या हल्ल्यांमुळे धक्का पोहोचू शकतो, अशी भीती ट्रम्प यांना आहे. याच कारणामुळे हा तणाव वाढला आहे. अमेरिकेत अंतर्गत पातळीवर या युद्धाला मोठा विरोध होत असून, यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने ट्रम्प यांच्यावर राजकीय दबाव आहे. यामुळेच ते हा युद्धबंदी करार करण्यासाठी आग्रही आहेत.

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार