आंतरराष्ट्रीय

मस्क-ट्रम्प वाद पुन्हा पेटणार! 'त्या' सेक्स स्कँडल प्रकरणात एकही अटक झाली नसल्याचे मस्क यांचे ट्विट

ट्रम्प यांनी ‘बिग ब्युटीफुल’ विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर मस्क यांनी ट्रम्प यांच्याशी फारकत घेतली आहे. तेव्हापासून दोघांमध्ये सोशल मीडियावरून सतत एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यातच आता मस्क यांनी स्वतःचा पक्षच काढला आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : 'त्या' सेक्स स्कँडल प्रकरणात एकही अटक झाली नसल्याचे ट्विट जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक मस्क यांनी केल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद पुन्हा नव्याने पेटण्याचे संकेत मिळत आहेत.

ट्रम्प यांनी ‘बिग ब्युटीफुल’ विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर मस्क यांनी ट्रम्प यांच्याशी फारकत घेतली आहे. तेव्हापासून दोघांमध्ये सोशल मीडियावरून सतत एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यातच आता मस्क यांनी स्वतःचा पक्षच काढला आहे.

मस्क यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवणारी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी "जेफ्री एपस्टिन प्रकरणात आजवर किती अटक झाली, असा सवाल करत "अधिकृत अरेस्ट काऊंटर" शेअर करत त्यावर शून्य क्रमांक दाखवले आहेत. म्हणजे या प्रकरणात अद्याप एकालाही अटक झालेली नाही, अशी अप्रत्यक्ष टीका करत मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.

एपस्टिन प्रकरण नेमके काय आहे?

जेफ्री एपस्टिन ही धनाढ्य व्यक्ती अल्पवयीन मुलींशी संबंधित लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांमध्ये अडकली होती. २०१९ मध्ये जेफ्री तुरुंगात मृतावस्थेत आढळून आला. अनेकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता.

मस्क यांच्या 'अटक काऊंटर' पोस्टने पुन्हा एकदा एपस्टिन प्रकरण, ट्रम्प यांच्यावरील संशय आणि सरकारी यंत्रणांवरील प्रश्नचिन्ह यांचा त्रिकोण चर्चेत आणला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, यामागचा उद्देश आणि त्याचे राजकीय परिणाम यावर चर्चा तापली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांच्या तिसऱ्या पक्षाची उडविली खिल्ली

उद्योगपती एलॉन मस्क यांनी राजकीय पक्षाची घोषणा केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांच्या ‘अमेरिका पार्टी’ची खिल्ली उडवली आहे. तिसरा पक्ष सुरू करणे हास्यास्पद आहे, अमेरिकेत तिसरा पक्ष कधीही यशस्वी होत नसल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. यासंदर्भात ट्रम्प यांनी न्यू जर्सी गोल्फ क्लबमधून वॉशिंग्टनला परतत असताना पत्रकारांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. तसेच ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांच्या या निर्णयाबाबत ‘ट्रुथ सोशल’ माध्यमावरही प्रतिक्रिया दिली.

मला वाटते की, तिसऱ्या पक्षाची सुरुवात करणे हास्यास्पद आहे. अमेरिकेत नेहमीच द्विपक्षीय व्यवस्था राहिली आहे. त्यामुळे मला वाटते की, तिसऱ्या पक्षाची घोषणा केल्यामुळे गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. तिसऱ्या पक्षाने कधीही काम केलेले नाही. पण एलॉन मस्क हे मनोरंजनासाठी पक्ष तयार करू शकतात, हे मला हास्यास्पद वाटते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस