एक्स@adityasvlogs
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेतील बेकायदा स्थलांतरित भारतीयांची पाठवणी सुरू; १०४ जणांची पहिली तुकडी मायदेशात दाखल

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांवर कारवाई सुरू केली आहे.

Swapnil S

अमृतसर : अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांवर कारवाई सुरू केली आहे. यात अमेरिकेत राहणाऱ्या अवैध भारतीयांवरही कारवाई केली जात आहे. याचाच भाग म्हणून, अमेरिकेचे लष्करी विमान अवैध भारतीय स्थलांतरितांना घेऊन बुधवारी भारतात पोहोचले. अवैध १०४ भारतीय स्थलांतरितांची पहिली तुकडी अमेरिकेच्या सी-१४७ या विमानातून अमृतसर येथे पोहोचली.

हे विमान अमृतसर विमानतळावर उतरले. यावेळी पोलीस आणि प्रशासन तैनात होते. अमेरिकन दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, विमानात एकूण १०४ भारतीय आहेत. स्थलांतरित मायदेशात दाखल

त्यामध्ये १३ मुले, ७९ पुरुष आणि २५ महिलांचा समावेश आहे. या भारतीयांपैकी गुजरातमधील- ३३, पंजाबमधील- ३०, उत्तर प्रदेशातील- तीन, हरियाणातील-३३, चंदिगडमधील -दोन आणि महाराष्ट्रातील तीन जणांचा समावेश आहे.

डंकी मार्गाने अमेरिकेत प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीयांना मेक्सिको-अमेरिका सीमेवर पकडण्यात आले होते. ते सर्वजण कायदेशीररित्या भारतातून निघाले होते, मात्र पुढे डंकी मार्गाने त्यांनी अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. या लोकांना भारतात आल्यावर अटक करण्यात येणार नाही, कारण त्यांनी कोणत्याही प्रकारे भारतीय कायद्यांचे उल्लंघन केलेले नाही.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा