आंतरराष्ट्रीय

उडत्या तबकड्यांविषयी गूढ कायम - नासाचा अहवाल सादर

नवशक्ती Web Desk

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने (नासा) उडत्या तबकड्यांविषयी एक अहवाल गुरुवारी प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार उडत्या तबकड्यांविषयीचे गूढ अद्याप कायम आहे. मानवाकडे सध्या असलेली माहिती किंवा तंत्रज्ञान याबाबत काही ठोस विधान करण्यास पुरेसे नाही, असे अहवालात म्हटले आहे.

मानवाने १९६०च्या दशकाच्या अखेरीस चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर जगभरात अंतराळ संशोधनाबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. विश्वात कोठेतरी मानवसदृश प्राण्यांची वस्ती असावी आणि त्यांची याने पृथ्वीच्या आसपास भ्रमण करत असावीत, असा अंदाज बांधला जात होता. १९७० आणि १९८०च्या दशकात उडत्या तबकड्यांची (अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स - यूएफओ) बरीच चर्चा होत होती. जगातील अनेक भागांतील लोकांनी उडत्या तबकड्या पाहिल्याचा दावाही केला होता. स्टार ट्रेकसारख्या टेलिव्हिजन मालिकांमधून त्याविषयीच्या कुतुहलात भरच पडत होती. त्यांच्या शोधासाठी विविध वैज्ञानिक प्रकल्पही हाती घेतले गेले. नासाने सर्च फॉर एक्ट्रा-टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स (सेटी) नावाने परग्रहवासीयांचा शोध घेण्याचा उपक्रम राबवला. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नाही. परग्रहवासीयांची कोणत्याही स्वरूपाची ठोस माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

आता नासाने उडत्या तबकड्यांविषयीचा ३३ पानी अहवाल सादर केला आहे. त्यातही साधारण असेच निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. मानवाकडे सध्या असलेला डेटा पुरेसा नाही. तसेच सध्या उपलब्ध असलेले मानवी तंत्रज्ञान हा शोध घेण्यास पुरेसे नाही, असे अहवालात म्हटले आहे. त्यासाठी अधिक प्रगत तंत्रज्ञानाची गरज असल्याचे मत अहवालात व्यक्त केले आहे. नासाने अहवालात यूएफओऐवजी अनआयडेंटिफाइड एरियल फेनॉमेनॉन (यूएपी) असा उल्लेख केला आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त