अमेरिकेचे इराणवर ‘स्वसंरक्षणार्थ’ हल्ले; क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य केल्याचा अमेरिकन लष्कराचा दावा संग्रहित छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

एच-१बीची शुल्कवाढ आणखी एक वर्षांसाठी - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाद्वारे परदेशी कामगारांना अमेरिकेत आणणाऱ्या कंपन्यांवर लादलेले १,००,००० डॉलरचे (सुमारे ८४ लाख रुपये) शुल्क आणखी एका वर्षासाठी वाढवले आहे, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाद्वारे परदेशी कामगारांना अमेरिकेत आणणाऱ्या कंपन्यांवर लादलेले १,००,००० डॉलरचे (सुमारे ८४ लाख रुपये) शुल्क आणखी एका वर्षासाठी वाढवले आहे, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. शुक्रवारी जारी केलेल्या जाहीरनाम्यात ट्रम्प यांनी नमूद केले की, २०२५ मध्ये १ लाख डॉलरचे शुल्क लागू करण्याच्या निर्णयामुळे मोठ्या आयटी आऊटसोर्सिंग कंपन्यांच्या एच-१बी नोंदणीमध्ये ९२ टक्क्यांची मोठी घट झाली आहे.

शुल्क आकारणीचा २०२५ मधील हा निर्णय सध्या कायदेशीर अडचणीत सापडला असून, हे प्रकरण अमेरिकेच्या दोन वेगवेगळ्या फेडरल न्यायालयांसमोर प्रलंबित आहे. शुल्कवाढीचा हा आदेश या महिन्यात संपुष्टात येत होता. हा निर्णय आधीपासूनच अमेरिकेत विद्यार्थी व्हिसावर असलेल्या परदेशी नागरिकांना तसेच विद्यमान व्हिसाच्या नूतनीकरणाला लागू नव्हता. नव्या एच-१बी व्हिसाधारकांमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : झोपड्या पाडणार! १४ फुटांहून अधिक उंचीच्या झोपड्यांवर होणार कारवाई; १ ऑक्टोबरपासून महापालिकेची मोहीम

Thane Ganeshotsav 2026 : 'प्रसादा'साठी व्यावसायिक गॅस सिलिंडर अनिवार्य

Mumbai : आयआयटी विद्यार्थ्यांचे आंदोलन; आणखी एक आत्महत्या, छळ करून हत्या झाल्याचा आईचा आरोप

Monsoon Update : मान्सूनचा काढता पाय; राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची माहिती

Maharashtra TET Paper Leak : ८,००० रुपयांसाठी बुटांमध्ये लपवून चोरल्या प्रश्नपत्रिका