PM
आंतरराष्ट्रीय

हाफिज सईदचा पक्ष पाकमधील निवडणुकीच्या रिंगणात !

हाफिज सईदने २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मिल्ली मुस्लिम लीगच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती.

Swapnil S

लाहोर: भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद याचा राजकीय पक्ष पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ८ फेब्रुवारी २०२४ ला पाकिस्तानमध्ये संसदेची निवडणूक होणार आहे. हाफिज सईदने आपल्या सर्व संसदीय आणि राज्य विधानसभेच्या जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदही या निवडणुकीत नशीब आजमावणार आहे. तो लाहोरमधून निवडणूक लढवणार आहेत. हाफिज सईदच्या या पक्षाचे निवडणूक चिन्ह खुर्ची आहे.

हाफिज सईदने २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मिल्ली मुस्लिम लीगच्या  माध्यमातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. मिल्ली मुस्लिम लीग ही जमात-उद-दावाचा एक भाग होती. मात्र आंतरराष्ट्रीय दबावाखाली पाकिस्तानने जमात-उद-दावा आणि त्यांची राजकीय शाखा मिल्ली मुस्लिम लीगवर बंदी घातल्याने त्याचे नाव बदलून पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग असे ठेवले आहे.

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण

प्रयागराजमधील ड्रग्जची 'फॅक्टरी' उद्ध्वस्त; गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ची कारवाई, ६९.७५९ किलो एमडी जप्त

एसआयटीकडून चौकशी करा! डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फलटणमध्ये जनआक्रोश मोर्चा

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी