AFP
आंतरराष्ट्रीय

Israel, Hezbollah: कमांडरच्या हत्येचा बदला; हिजबुल्लाने इस्रायलवर डागली ३०० हून अधिक रॉकेट

दहशतवादी संघटना हिजबुल्लाने लेबनॉनमध्ये कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इस्रायलवर रविवारी ३०० हून अधिक रॉकेट डागली.

Swapnil S

तेल अवीव : दहशतवादी संघटना हिजबुल्लाने लेबनॉनमध्ये कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इस्रायलवर रविवारी ३०० हून अधिक रॉकेट डागली. इस्रायलच्या ११ सैन्य तळांवर हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इस्रायलच्या १०० लढाऊ विमानांनी हिजबुल्लाचे रॉकेट लाँचर उद्ध्वस्त केले.

इस्रायली सेना ‘आयडीएफ’ने सांगितले की, हिजबुल्लाने डागलेले बहुतेक रॉकेट ‘आर्यन डोम’च्या मदतीने हवेतच नष्ट केली. इस्रायलने तत्काळ मंत्रिमंडळाची बैठक घेतली. तसेच देशात ४८ तासांची आणीबाणी जाहीर केली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू म्हणाले की, देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जो आमचे नुकसान करेल, त्यांना आम्ही सोडणार नाही, असे त्यांनी ठणकावले.

इस्रायलचे संरक्षणमंत्री योआव गॅलंट यांनी येत्या ४८ तासांसाठी देशात आणीबाणीची घोषणा केली. दरम्यान, हिजबुल्लाचा गड असलेल्या दक्षिण लेबनॉनमधील नागरिकांना तत्काळ घर सोडण्याचे आवाहन इस्रायली लष्कराने केले आहे.

"धमकीची माहिती देऊनही..." ; खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्याप्रकरणी नातेवाईकांचा गंभीर आरोप

खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरार; धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

पुण्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी; निवडणुकीच्या युती-आघाड्यांची नव्याने मांडणी

BMC Election : महायुतीचे २०७ जागांवर एकमत, २० जागांवर चर्चा सुरू

आरोपी बंडू आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात; हातात बेड्या, गळ्यात दोरखंड, घोषणाबाजी करत अर्ज भरायला गेला, पण...