आंतरराष्ट्रीय

इम्रान खान यांच्या घराला पोलिसांचा वेढा; 30-40 दहशतवादी लपले असल्याची माहिती

पाकिस्तानातील पोलीस याप्रकरणी अलर्ट झाले असून इम्रान यांच्या सुरक्षेच्या कारनास्तव त्यांच्या घराला वेढा दिला आहे.

नवशक्ती Web Desk

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे काही महिन्यापासून चर्चेत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार इम्रान खान यांच्या निवासस्थानी दहशतवादी लपले असल्याचे सांगितले जात आहे. नेमके किती दहशदतवादी लपले आहेत, याची कोणातीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरीही जवळपास 30-40 दहशतवादी लपल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानातील पोलीस याप्रकरणी अलर्ट झाले असून इम्रान यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या घराला वेढा दिला आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील जमान पार्क भागात इम्रान खान यांचे निवासस्थान आहे. त्याठिकाणी दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली असल्याने पाकिस्तानच्या पोलिसांकडून घराला वेढा घालण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून इम्रान खान यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मागे इम्रान यांना अल कादीर ट्रस्ट प्रकरणात अटक देखील करण्यात आली होती. यावेळी पाकिस्तानी तहरीक ए इन्साफ'चे नेते मुसर्रत चीमा यांनी इम्रान यांना टॉर्चर करण्यात येत असल्याचा दावा केला होता. तसेच इम्रान यांच्या वकीलाला देखील मारहाण झाली असून त्यात ते गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात होते. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या लाहोर शहरात मोठी रॅली काढली होती. या रॅलीत त्यांनी पाकिस्तानच्या लष्करावर गंभीर आरोप केले होते. तसेच पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला होता. या रॅलीनंतर इम्रान यांना अटक करण्यात आली होती.

अटकेनंतर पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान यांना तासाभरात न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचे ठरवत त्यांचा जामीन मंजूर करत सुटका करण्याचे आदेश दिले होते.

भारत-पाक सामन्याला तीव्र विरोध; ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यभर ‘माझा देश, माझं कुंकू’ आंदोलन, टीव्हीची तोडफोड

डॉ. आंबेडकरांचे शिक्षणतत्त्व

आरक्षणाचा तोडगा की नव्या संघर्षाची बीजपेरणी?

आजचे राशिभविष्य, १५ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढत आज; दुबईत रंगणार मैदानातील महायुद्ध