संग्रहित छायाचित्र पीटीआय
आंतरराष्ट्रीय

भारत-चीन तणाव निवळला! नियंत्रण रेषेवरून माघारीची प्रक्रिया पूर्ण

भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दोन्ही देशांच्या सैनिकांची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन्ही देशांचे सैन्य आता आपल्या जागेतील चौक्या हटवण्याचे काम करत आहेत...

Swapnil S

नवी दिल्ल : भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दोन्ही देशांच्या सैनिकांची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन्ही देशांचे सैन्य आता आपल्या जागेतील चौक्या हटवण्याचे काम करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

२१ ऑक्टोबर रोजी भारताने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्तीबाबत चीनसोबत एका कराराची घोषणा केली. त्यामुळे चार वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आला आहे.

संरक्षण क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, भारत व चिनी सैनिकांची माघारीची प्रक्रिया ९० टक्के पूर्ण झाली आहे. आता दोन्ही देशांच्या चौक्या हटवण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया मंगळवारपर्यंत पूर्ण होईल.

आता दोन्ही देशांची गस्त सुरू होणार

२९ ऑक्टोबरपर्यंत देपसांग व देमचोक येथून सैन्य माघारी घेण्याचे लक्ष्य भारतीय लष्कराने ठेवले होते. त्यानंतर आता दोन्ही देशांची गस्त सुरू होईल. अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद सोडवण्याच्या दृष्टीने भारत प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एप्रिल २०२० पूर्वीची स्थिती निर्माण होऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी