बांगलादेशात भारतीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू 
आंतरराष्ट्रीय

बांगलादेशात भारतीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तालयात एका अधिकाऱ्याचे शव संशयास्पद स्थितीत सापडले आहे.

Swapnil S

ढाका : बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तालयात एका अधिकाऱ्याचे शव संशयास्पद स्थितीत सापडले आहे. चितगावमधील खुल्शी परिसरात असलेल्या भारताच्या सहाय्यक उच्चायुक्तालयांच्या कार्यालयातून मंगळवारी एका भारतीय नागरिकाचे शव पोलिसांनी ताब्यात घेतले. नरेंद्र (३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते चितगावमधील भारतीय उच्चायुक्तालयात सुरक्षा शिष्टाचार अधिकारी होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नरेंद्र यांनी मंगळवारी सकाळी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला नसल्याने तेथील अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या परीने दार उघडण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना  अपयश आले. अखेर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पुढच्या काही मिनिटांत पोलीस उच्चायुक्तालयात पोहोचले. त्यांनी एका खोलीतून नरेंद्र यांचे शव ताब्यात घेतले. नरेंद्र हे हरियाणाचे रहिवासी आहेत.

भारतीय उच्चायुक्तालयात सुरक्षा शिष्टाचार अधिकारी म्हणून ते कार्यरत होते, अशी माहिती चितगाव मेट्रोपॉलिटन पोलीस आयुक्त हसन मोहम्मद शौकत अली यांनी बांगलादेशी वृत्तपत्र 'द डेली स्टार'ला दिली. दूतावासात असलेल्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला नरेंद्र यांना अनेकदा हाका मारल्या. पण नरेंद्र यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video