अमेरिकेत भारतीयाने पत्नी व तीन नातेवाईकांना केले ठार; कपाटात लपल्याने मुलांचा वाचला जीव Photo : X
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत भारतीयाने पत्नी व तीन नातेवाईकांना केले ठार; कपाटात लपल्याने मुलांचा वाचला जीव

मेरिकेच्या जॉर्जिया राज्यात कौटुंबिक वादातून चार जणांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये आरोपीने पत्नी व आणखी तीन नातेवाईकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Swapnil S

जॉर्जिया : अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात कौटुंबिक वादातून चार जणांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये आरोपीने पत्नी व आणखी तीन नातेवाईकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ग्विनेट काउंटी पोलिसांनी शुक्रवारी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, विजय कुमार नावाच्या व्यक्तीने आपली पत्नी मीमू डोगरा, तसेच नातेवाईक गौरव कुमार, निधी चांदेर आणि हरीश चांदेर यांची गोळ्या झाडून हत्या केली.

पोलिसांनी सांगितले की, अटलांटा येथील त्यांच्या निवासस्थानी कुमार आणि डोगरा यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर ते सर्वजण ब्रुक इवी येथील एका नातेवाईकाच्या घरी गेले. त्यांच्यासोबत विजय कुमार यांचा १२ वर्षांचा मुलगाही होता. याच घरात गौरव, निधी आणि हरीश आणि सात आणि दहा वर्षांची दोन मुलेही राहत होती. गोळीबारानंतर सर्वप्रथम कुमार यांच्या मुलानेच ९११ क्रमांकावर फोन केला.

पोलिसांनी सांगितले की, मुलांना नेमका वाद कशावरून होत आहे किंवा ते त्या ठिकाणी का आले आहेत, याची काहीच कल्पना नव्हती. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरात चार मृतदेह आढळले. घराच्या आत फक्त तीन मुले होती, जी कपाटात लपून बसली होती. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

अटलांटा येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने या गोळीबाराच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. कथित हल्लेखोराला अटक केली असून पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत दिली जात असल्याचे दूतावासाने म्हटले आहे.

भारतीय वाणिज्य दूतावासाने सोशल मीडिया मंच 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले, 'कथित कौटुंबिक वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक भारतीय नागरिकही आहे. आरोपी विजय कुमार याच्यावर गंभीर हल्ला, खून, द्वेषपूर्ण हेतूने खून आणि मुलांवरील क्रूरतेसंबंधीचे आरोप दाखल करण्यात आले आहेत.

अजित दादा पंचतत्त्वात विलीन! शोकाकूल वातावरणात पार्थ आणि जय पवारांनी दिला मुखाग्नी; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Ajit Pawar death : अपघाताची बातमी दादांच्या आईने पाहिली तेव्हा..."मला दादांना भेटायचे आहे!"

'दादा'ला I Love You सांग...; अजित पवारांवर अंत्यसंस्कारापूर्वी बारामती मेडिकल कॉलेजबाहेर कार्यकर्त्याने फोडला हंबरडा, भावूक Video

एका चुकीबद्दल अन्नपाण्याविना केला होता आत्मक्लेश; यशवंतरावांचे स्मृतिस्थळ होते अजितदादांचे शक्तिस्थळ!

Ajit Pawar : विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्री; पण, महाराष्ट्राचे सर्वोच्च पद दूरच...