डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू काश पटेल FBI चे नवे संचालक, अमेरिकन सिनेटची मंजुरी  एक्स
आंतरराष्ट्रीय

डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू काश पटेल FBI चे नवे संचालक, अमेरिकन सिनेटची मंजुरी

अतिशय चुरशीच्या मुकाबल्यात, सिनेटने ५१-४९ मतांनी या नियुक्तीला मंजूरी दिली. रिपब्लिकन पक्षाच्या बहुतांश सदस्यांनी पटेल यांच्या बाजूने मतदान केले, तर डेमोक्रॅटिक सदस्यांनी त्याला विरोध केला. मात्र, रिपब्लिकन पक्षाच्या दोन सिनेट सदस्यांनी...

Krantee V. Kale

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू आणि भारतीय वंशाचे काश पटेल यांची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) चे नवीन संचालक म्हणून नियुक्तीला अमेरिकन सिनेटने मंजुरी दिली आहे. काश पटेल एफबीआयचे ९ वे संचालक बनले आहेत. पटेल यांच्या नियुक्तीकडे अमेरिकेच्या सर्वोच्च तपास संस्थेच्या नेतृत्व रचनेत मोठा बदल म्हणून पाहिले जात आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पटेल यांची नियुक्ती प्रस्तावित केली होती. अतिशय चुरशीच्या मुकाबल्यात, सिनेटने ५१-४९ मतांनी या नियुक्तीला मंजूरी दिली. रिपब्लिकन पक्षाच्या बहुतांश सदस्यांनी पटेल यांच्या बाजूने मतदान केले, तर डेमोक्रॅटिक सदस्यांनी त्याला विरोध केला. मात्र, रिपब्लिकन पक्षाच्या दोन सिनेट सदस्यांनी – सुसान कॉलिन्स (मेन) आणि लिसा मर्कोव्स्की (अलास्का) – यांनी पटेल यांच्या विरोधात मत देत नियुक्तीला विरोध दर्शवला.

कॉलिन्स आणि मर्कोव्स्की यांची चिंता

सुसान कॉलिन्स (मेन) आणि लिसा मर्कोव्स्की (अलास्का) यांनी काश पटेल यांच्या नेमणुकीला विरोध करताना त्यांच्या ट्रम्प समर्थक राजकीय भूमिकेबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी पटेल यांच्या पूर्वीच्या राजकीय भूमिका एफबीआयच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीवर परिणाम करू शकतात, अशी भीती व्यक्त केली.

कोण आहेत काश पटेल?

कश्यप प्रमोद विनोद पटेल, ज्यांना सर्वसाधारणपणे काश पटेल म्हणून ओळखले जाते, हे अमेरिकन वकील आहेत. त्यांचा जन्म न्यूयॉर्कमधील गार्डन सिटी येथे झाला असून, त्यांचे पालक भारतातून स्थलांतरित झाले होते. पटेल यांनी यापूर्वी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकन सरकारमध्ये सेवा बजावली आहे. त्यांनी हाऊस इंटेलिजन्स कमिटीमध्ये वरिष्ठ सहायक म्हणून काम केले, जिथे त्यांनी २०१६ च्या निवडणुकीत रशियन हस्तक्षेपासंबंधीच्या चौकशांना आव्हान देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर (National Security Council) आणि कार्यवाहक संरक्षण सचिवांचे प्रमुख सचिव (Chief of Staff) म्हणूनही जबाबदारी सांभाळली.

पटेल यांच्या नेमणुकीमुळे एफबीआयच्या आगामी धोरणांवर आणि कार्यप्रणालीवर कसा प्रभाव पडेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

आता लक्ष कसोटी मालिकेकडे; गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आजपासून वेस्ट इंडिजशी पहिला सामना

डाळ उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकारची योजना; ११,४४० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर, ६ पिकांचा MSP वाढवला

दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी; DA आणि DR मध्ये ३ टक्के वाढ