आंतरराष्ट्रीय

भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली; नेपाळमध्ये मोठी दुर्घटना, १४ जणांना जलसमाधी

Swapnil S

जवळपास ४० ते ५० भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नेपाळमधील तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगदी नदीत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये किमान १४ लोकांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते. पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबलेल्या भारतीय प्रवाशांना घेऊन ही बस काठमांडूकडे रवाना झाली होती. अपघातानंतर मदत आणि बचावकार्यात १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून १६ जखमी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. स्थानिक मीडियानुसार, अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलेत आणि अपघातस्थळी अद्यापही मदत व बचावकार्य सुरू आहे. या भीषण अपघातात मृतांचा तसंच जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

यूपी एफटी ७६२३ या क्रमांकाची ही बस असून ती नदीच्या काठावर पडली आहे, असा दुजोरा जिल्हा पोलिस कार्यालय तानाहुनचे डीएसपी दीपकुमार राया यांनी दिला. बस नदीमध्ये कशी कोसळली याच्या कारणाचाही शोध घेतला जात आहे. उत्तर प्रदेशच्या आपत्ती निवारण आयुक्तांनी घटनेची दखल घेतली असून नेपळशी संपर्क प्रस्थापित करण्याचे आणि बस अपघातात राज्यातील कोणी रहिवासी सामील आहेत की नाही हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला