एक्स बॉयफ्रेंडनेच केली हत्या? अमेरिकेत भारतीय तरुणीचा आढळला मृतदेह, शेवटची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल - "माझ्या कॅमेऱ्याचा...  
आंतरराष्ट्रीय

एक्स बॉयफ्रेंडनेच केली हत्या? अमेरिकेत भारतीय तरुणीचा आढळला मृतदेह, शेवटची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल - "माझ्या कॅमेऱ्याचा...

निकिता गोधीशालाचा मृतदेह अमेरिकेतील कोलंबिया येथे तिच्याच एक्स बॉयफ्रेंडच्या घरात आढळून आला आहे. निकिता काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या एक्स बॉयफ्रेंडनेच पोलिसांत नोंदवली होती.

Mayuri Gawade

अमेरिकेत एका भारतीय तरुणीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निकिता राव गोधीशाला (वय २७) असे या तरुणीचे नाव असून, तिचा मृतदेह अमेरिकेतील मॅरिलँड येथे तिच्याच एक्स बॉयफ्रेंडच्या घरात आढळून आला आहे. निकिता काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांत नोंदवली होती. मात्र, तक्रार दाखल केल्यानंतर त्याच दिवशी तो भारतात पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली असता, तिथे निकिताचा मृतदेह आढळून आला.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता गोधीशाला ही ३१ डिसेंबरपासून बेपत्ता होती. तिचा एक्स बॉयफ्रेंड अर्जुन शर्मा (वय २६) याने २ जानेवारी रोजी पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार करताना निकिताला शेवटचं मॅरिलँड येथील त्याच्याच फ्लॅटमध्ये पाहिलं असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं होतं.

तक्रार नोंदवताच एक्स बॉयफ्रेंड फरार

मात्र, ही तक्रार नोंदवल्यानंतर त्याच दिवशी अर्जुन शर्मा भारतात फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी ३ जानेवारी रोजी अर्जुन शर्माच्या फ्लॅटची झडती घेतली असता, तिथे निकिताचा मृतदेह आढळून आला. ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजल्यानंतर तिची हत्या झाल्याचा अंदाज तपासकर्त्या पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. तक्रार नोंदवून लगेचच अर्जुन शर्मा फरार झाल्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर अधिक बळावला आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अमेरिकन पोलीस त्याचा शोध घेत असून, त्यासाठी भारतीय तपास यंत्रणांशी संपर्क साधण्यात आला आहे.

"My camera roll got full!"... शेवटची इंस्टाग्राम पोस्ट ठरली भावनिक

हत्येच्या तपासादरम्यान, सर्वांचे लक्ष निकिताच्या शेवटच्या सोशल मीडिया पोस्टकडे गेले आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या शेवटच्या पोस्टमध्ये तिने जिममधील फोटो, मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले आनंदाचे क्षण आणि वाढदिवस साजरा करतानाचे फोटो शेअर केले होते. या सगळ्या फोटो डंपला तिने दिलेली कॅप्शन होती - "My camera roll got full!" म्हणजेच "माझ्या कॅमेऱ्याचा रोल पूर्ण भरून गेला". त्या वेळी कॅप्शनमधील हे वाक्य कदाचित साधं, हलकंफुलकं वाटलं असावं, पण आज तिच्या मृत्यूनंतर ही साधी वाटणारी ओळ तिच्या आयुष्याशी नकळत जोडलेली असल्याची भावना अनेकजण व्यक्त करत आहेत.

भारतीय दूतावास कुटुंबाच्या संपर्कात

या घटनेनंतर वॉशिंग्टन डी.सी. येथील भारतीय दूतावास निकिताच्या कुटुंबीयांशी संपर्कात आहे. दूतावासाकडून कुटुंबाला आवश्यक ती मदत पुरवली जात असून, अमेरिकेतील पोलिसांशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. दरम्यान, ही हत्या नेमकी का झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी सध्या पोलीस तपास करत असून, या घटनेबाबत माहिती असलेल्या नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन अमेरिकन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

भारतावर आता ५०० टक्के टॅरिफ? ट्रम्प प्रशासन 'रशियावरील निर्बंध' विधेयकाद्वारे पुन्हा झटका देण्याच्या तयारीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास; “मुंबईचा महापौर मराठी हिंदू...

"हॉटेलमध्ये बोलावले अन्..."; अल्पवयीन नेमबाज युवतीचा राष्ट्रीय प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Mumbai : कांदिवलीमध्ये ट्रेडिंगच्या बहाण्याने व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक; भावाला अटक, बहीण फरार

Bigg Boss Marathi 6 : श्रेयस तळपदे जाणार 'बिग बॉस'च्या घरात? अभिनेत्याने स्वतःच सांगितलं, "लोक प्रसिद्धीसाठी काहीही करतात"