होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे पुन्हा निर्बंध; अमेरिकेने कराराचा भंग केल्याचा आरोप 
आंतरराष्ट्रीय

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे पुन्हा निर्बंध; अमेरिकेने कराराचा भंग केल्याचा आरोप

अमेरिकेने इराणशी संबंधित जहाजांची नाकेबंदी कायम ठेवल्याने संतप्त झालेल्या इराणने अवघ्या २४ तासांच्या कालावधीत होर्मुझच्या जलमार्गावर पुन्हा एकदा कडक निर्बंध लादले आहेत.

Swapnil S

कैरो: अमेरिकेने इराणशी संबंधित जहाजांची नाकेबंदी कायम ठेवल्याने संतप्त झालेल्या इराणने अवघ्या २४ तासांच्या कालावधीत होर्मुझच्या जलमार्गावर पुन्हा एकदा कडक निर्बंध लादले आहेत. यामुळे जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊन महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने शनिवारी जाहीर केले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीचे नियंत्रण पुन्हा जुन्या स्थितीत आणण्यात आले असून, आता हा मार्ग सशस्त्र दलांच्या कडक देखरेखीखाली असेल. जोपर्यंत अमेरिका इराणच्या बंदरांची नाकेबंदी मागे घेत नाही, तोपर्यंत या मार्गावरून होणारी वाहतूक रोखली जाईल, असा इशाराही इराणने दिला आहे.

सध्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक 'केप्लर' या डेटा फर्मच्या माहितीनुसार केवळ इराणने निश्चित केलेल्या मर्यादित मार्गांवरूनच सुरू आहे. अमेरिकेने आतापर्यंत इराणकडे जाणारी २१ जहाजे परतवून लावली आहेत.

शुक्रवारी इराणने हा जलमार्ग खुला करण्याचे संकेत दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. इराणने अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत नवा करार करेपर्यंत आमची नाकेबंदी पूर्ण ताकदीनिशी सुरूच राहील, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे इराणने संताप व्यक्त करत हा 'युद्धविराम कराराचा भंग' असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होईल या आशेने तेलाच्या किमती घसरत होत्या, मात्र आता पुन्हा निर्बंध लादल्या गेल्याने ऊर्जा संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत.

करार करेपर्यंत आमची नाकेबंदी पूर्ण ताकदीनिशी सुरूच राहील, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे इराणने संताप व्यक्त करत हा 'युद्धविराम कराराचा भंग' असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होईल या आशेने तेलाच्या किमती घसरत होत्या, मात्र आता पुन्हा निर्बंध लादल्या गेल्याने ऊर्जा संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत.

इराणच्या गोळीबारानंतर भारतीय जहाजांची माघार

इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड'ने (आयआरजीसी) हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये गोळीबार केल्यानंतर, चार भारतीय जहाजांना आपला मार्ग बदलावा लागला असून त्यांनी माघार घेतली आहे. 'टँकर ट्रॅकर्स डॉट कॉम' या जहाज मार्गक्रमण करणाऱ्या संस्थेने ही माहिती दिली आहे.

माघार घेतलेल्या जहाजांमध्ये भारताच्या ध्वजांकित एका 'सुपर टैंकर'चा समावेश आहे. या टँकरमध्ये इराकचे २० लाख बैरल कच्चे तेल असल्याचे समजते. ब्रिटिश लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या दोन युद्धनौकांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका टँकरवर गोळीबार केला. इराणने या महत्त्वाच्या जलमार्गावर पुन्हा निबंध लागू केल्याची घोषणा केल्यानंतर ही घटना घडली आहे.

मोजतबा खामेनी यांचा इशारा

कैरो : इराणचे 'शूर नौदल' आपल्या शत्रूना 'नव्याने आणि कडू पराभव' चाखविण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजताबा खामेनी यांनी दिला आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर पुन्हा एकदा वेगाने निर्बंध लादण्यास सुरुवात केली असून, याच पार्श्वभूमीवर खामेनी यांनी हा आक्रमक संदेश दिला आहे.

रशियन तेल खरेदीसाठी एक महिन्याची मुदतवाढ

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेने निबंधांमधून दिलेली सवलत आणखी एका महिन्यासाठी वाढवली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने ही सवलत वाढवून देण्यास नकार दिला होता, मात्र आता आपल्या निर्णयावरून घूमजाव करत ही सवलत १६ मेपर्यंत वाढविली.

अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी उशिरा एक आदेश जारी केला. यानुसार, जे रशियन तेल १७ एप्रिल किंवा त्यापूर्वीच जहाजावर चढवण्यात आले आहे (समुद्रमार्गे प्रवासात आहे), अशा तेलाच्या खरेदीवरील निबंधांना १६ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

भारतालाही मिळाला होता दिलासा

यापूर्वी अमेरिकेने भारताला ५ मार्चपासून एक महिन्यासाठी रशियन तेल खरेदी करण्यासाठी विशेष सवलत दिली होती. त्यानंतर इतर अनेक देशांनाही ११ एप्रिलपर्यंत अशीच सवलत देण्यात आली होती. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या नवीन 'जनरल लायसन्स'नुसार,इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड'ने (आयआरजीसी) हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये गोळीबार केल्यानंतर, चार भारतीय जहाजांना आपला मार्ग बदलावा लागला असून त्यांनी माघार घेतली आहे. 'टँकर ट्रॅकर्स डॉट कॉम' या जहाज मार्गक्रमण करणाऱ्या संस्थेने ही माहिती दिली आहे. ही सवलत आता मे महिन्यापर्यंत लागू राहील.

सवलतीतून वगळले

अमेरिकेने ही मुदतवाढ दिली असली तरी, यामध्ये काही कडक अटी कायम आहेत. इराण, उत्तर कोरिया, क्युबा किंवा युक्रेनच्याव्याप्त भागांतील कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संयुक्त उपक्रमाशी संबंधित व्यवहारांना या परवान्याद्वारे परवानगी देण्यात आलेली नाही.

धोरणात बदल

बुधवारी अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी स्पष्ट केले होते की, वॉशिंग्टन रशियन आणि इराणी तेलावरील निर्बंधांच्या सवलतीचे नूतनीकरण करणार नाही. मात्र, अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आधीच जहाजांवर लोड झालेले १४ कोटी बॅरल रशियन तेल जागतिक बाजारपेठेत उपलब्ध होणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेतल्याचे समजते.

इराणचा दोन भारतीय जहाजांवर गोळीबार

कैरो/दुबई : इराणने या जलमार्गावरील निर्बंध पुन्हा लागू करत दोन भारतीय व्यापारी जहाजांवर गोळीबार केल्याने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या दोन टँकरवर इराणच्या रिव्होल्युशनरी गाईसच्या दोन युद्धनौकांनी गोळीबार केला. सुदैवाने, या हल्ल्यात टैंकर आणि त्यातील कर्मचारी सुरक्षित आहेत.

भारताकडून इराणचा निषेध

नवी दिल्ली : होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर भारताने शनिवारी इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांना समन्स बजावले. इराणच्या 'रिव्होल्यूशनरी गार्ड्स'कडून करण्यात आलेल्या गोळीबारामुळे दोन भारतीय जहाजांना आपला मार्ग बदलावा लागल्याने भारताने यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. इराणच्या राजदूतांना बोलावून या घटनेबद्दल भारताने आपला तीव्र निषेध नोंदवला आहे.

इराणची आक्रमक भूमिका

इराणच्या लष्करी कमांडने स्पष्ट केले आहे की, 'होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आता पुन्हा एकदा इराणच्या सशस्त्र दलांचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले आहे.' जोपर्यंत अमेरिका इराणी बंदरांवरील आपली नाकेबंदी उठवत नाही, तोपर्यंत या जलमार्गातून होणारी वाहतूक रोखली जाईल, असा इशारा इराणने दिला आहे. इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रमुख इब्राहिम अझीझी यांनी सांगितले की, आता या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना इराणची परवानगी घ्यावी लागेल आणि टोल भरावा लागेल.

काँग्रेसच्या महिलाविरोधी भूमिकेमुळे देशाचे नुकसान! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल

...तर इराणवर पुन्हा हल्ले - डोनाल्ड ट्रम्प

आजचे राशिभविष्य,१९ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Akshaya Tritiya 2026 : आज अक्षय्य तृतीया; 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी, जाणून घ्या सविस्तर

Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा खास मराठी संदेश आणि आकर्षक कार्डस्