आंतरराष्ट्रीय

कुवैतमध्ये अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ल्याचा दावा; F-15 फायटर जेट कोसळले, Video

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओंमध्ये दूतावास परिसरातून धूर उसळताना दिसत आहे. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आता गंभीर वळण घेतले असून अमेरिका थेट या संघर्षात सहभागी झाल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि. २) इराणी ड्रोनने कुवैतमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला. त्याचवेळी अमेरिकन वायुदलाचे F-15E Strike Eagle लढाऊ विमान पश्चिम कुवैतमध्ये कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओंमध्ये दूतावास परिसरातून धूर उसळताना दिसत आहे. मात्र, या दृश्यांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही. या कथित हल्ल्यामुळे प्रादेशिक तणाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील गेल्या अनेक दशकांतील हा सर्वात तीव्र संघर्ष मानला जात आहे.

F-15E विमान कोसळले; वैमानिक सुरक्षित

२ मार्च २०२६ रोजी अमेरिकन वायुदलाचे F-15E Strike Eagle विमान पश्चिम कुवैतमध्ये कोसळले. माध्यमांच्या वृत्तानुसार, वैमानिकाने अपघातापूर्वी बाहेर उडी मारली (Eject) असून तो सुरक्षित आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काही व्हिडिओंमध्ये विमान वेगाने खाली येताना आणि अपघातस्थळी धूर उसळताना दिसत आहे. इतर दृश्यांमध्ये किरकोळ जखमी वैमानिकाला स्थानिक कुवैती नागरिक मदत करताना दिसतात.

कुवैत हवाई संरक्षण दलाची कारवाई

सोमवारी पहाटे कुवैत सैन्याने 'शत्रुत्वपूर्ण हवाई लक्ष्य' अडवले असल्याची माहिती दिली. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एक्स(X) वर पोस्ट करत सांगितले की, देशाच्या मध्यवर्ती कार्यक्षेत्रात ही लक्ष्ये शोधून निष्प्रभ करण्यात आली. या कारवाईत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून सशस्त्र दल उच्च सतर्कतेवर आहे.

इराणची संयुक्त राष्ट्रांकडे धाव

इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. त्यांनी अमेरिका आणि इस्रायलवर संयुक्त लष्करी कारवाईदरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे.

अमेरिका-इराण युद्धाची ठिणगी

अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या भूमीवर संयुक्त लष्करी कारवाई केली. या हल्ल्यांचा उद्देश तेहरानची क्षेपणास्त्र आणि लष्करी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करणे हा होता. या कारवाईनंतर इराणने तीव्र प्रत्युत्तर देत अमेरिकन तळांवर, आखाती देशांतील महत्त्वाच्या शहरांवर आणि मित्रदेशांवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले सुरू केल्याचे वृत्त आहे.

आखाती देशांमध्ये तणाव

इराणच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईदरम्यान कुवैत, बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या हवाई हद्दीत क्षेपणास्त्रे व ड्रोन अडवण्यात आल्याचे माहिती समोर आली आहे.

हवाई हल्ले, नौदल कारवाया आणि ड्रोन युद्धामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या संघर्षाचा परिणाम जागतिक राजकारण आणि तेल बाजारावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mumbai : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; परदेशातील भारतीयांसाठी दूतावासांच्या हेल्पलाइन सुरू

पाण्याचे फुगे, जबरदस्तीचा रंग… यंदा चालणार नाही! होळीपूर्वी मुंबई पोलिसांचा कडक इशारा; गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई

Navi Mumbai : धुलिवंदननिमित्त मेट्रोच्या वेळापत्रकात बदल; कधी बंद, कधी सुरू? जाणून घ्या माहिती

Iran vs Israel-US War : मध्यपूर्वेतील युद्धाचा महाराष्ट्राला फटका; विमानसेवा ठप्प, २०० पेक्षा जास्त प्रवासी दुबईत अडकले

पालघरमध्ये भागेरिया केमिकल कारखान्यात विषारी वायू गळती; प्रशासन सतर्क, नागरिकांना खबरदारीचा इशारा