पुन्हा लष्करी कारवाई केल्यास युद्ध मध्यपूर्वेबाहेर पसरेल; इराणचा अमेरिका - इस्रायलला इशारा X
आंतरराष्ट्रीय

पुन्हा लष्करी कारवाई केल्यास युद्ध मध्यपूर्वेबाहेर पसरेल; इराणचा अमेरिका - इस्रायलला इशारा

इराणवर यापुढे कोणतीही लष्करी कारवाई केल्यास भविष्यातील संघर्ष केवळ पश्चिम आशियापुरता (मध्यपूर्व) मर्यादित न राहता थेट या क्षेत्राबाहेरही पसरेल, असा इशारा इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (आयआरजीसी) बुधवारी आपल्या "शत्रूंना" (अमेरिका आणि इस्रायल) दिला आहे.

Swapnil S

तेहरान : इराणवर यापुढे कोणतीही लष्करी कारवाई केल्यास भविष्यातील संघर्ष केवळ पश्चिम आशियापुरता (मध्यपूर्व) मर्यादित न राहता थेट या क्षेत्राबाहेरही पसरेल, असा इशारा इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (आयआरजीसी) बुधवारी आपल्या "शत्रूंना" (अमेरिका आणि इस्रायल) दिला आहे. इराणची सरकारी वृत्तसंस्था 'इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग'ने हे वृत्त दिले आहे.

आयआरजीसीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, जर इराणवरील आक्रमणाची पुनरावृत्ती झाली, तर हे युद्ध मध्यपूर्व क्षेत्राबाहेरही पसरवले जाईल. आमचे अत्यंत घातक प्रहार तुम्हाला अशा ठिकाणी बसतील ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील नुकत्याच झालेल्या थेट संघर्षानंतर प्रादेशिक पातळीवर तणाव प्रचंड वाढला असून, या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे.

आयआरजीसीने दावा केला आहे की, मागील संघर्षादरम्यान इराणने आपल्या संपूर्ण लष्करी क्षमतेचा वापर केला नव्हता. निवेदनात म्हटले आहे की, जरी युद्धाच्या मागील फेरीत अमेरिका आणि इस्रायलने त्यांच्या सर्व शक्तीचा वापर केला असला, तरी आम्ही आमची पूर्ण क्षमता वापरली नव्हती. परंतु, आता इराणच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलले गेल्यास, इराणची नवीन प्रादेशिक आणि आंतर-प्रादेशिक लष्करी क्षमता सक्रिय केली जाईल.

त्यांनी पुढे म्हटले की, आम्ही आधीच इशारा दिला होता की अमेरिकेच्या आक्रमणामुळे हे युद्ध संपूर्ण प्रदेशाला कचाट्यात घेईल आणि तसेच झाले आहे. आमचे इशारे पोकळ नसतात. आम्ही युद्धाच्या मैदानात उतरणारे लोक आहोत आणि आमची ताकद तुम्हाला सोशल मीडियावरील पोकळ विधानांमधून नव्हे, तर थेट रणांगणात पाहायला मिळेल.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video