Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा वाढलाय? ग्लिसरीन आणि लवंगापासून घरच्या घरी तयार करा 'हे' सिरम

हिवाळ्यात थंड हवेमुळे त्वचेचा ओलावा कमी होऊन कोरडेपणा वाढतो. ग्लिसरीन आणि लवंगांचा वापर करून घरच्या घरी सिरम कसे तयार करायचे आणि त्वचेची काळजी कशी घ्यायची, जाणून घ्या.
Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा वाढलाय? ग्लिसरीन आणि लवंगापासून घरच्या घरी तयार करा 'हे' सिरम
Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा वाढलाय? ग्लिसरीन आणि लवंगापासून घरच्या घरी तयार करा 'हे' सिरम'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

हिवाळ्याची चाहूल लागताच हवेत गारवा जाणवू लागतो. मात्र, वातावरणातील बदलांचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो. थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेतील ओलावा कमी होऊन त्वचा रखरखीत, कोरडी आणि निस्तेज दिसू शकते. काही जणांच्या चेहऱ्यावर बारीक रेषाही अधिक उठून दिसतात. अशा वेळी त्वचेची योग्य काळजी घेण्यासोबतच मॉइश्चरायझिंगकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

यासाठी ग्लिसरीन आणि लवंग वापरून तयार केलेल्या घरगुती सिरमचा उपाय काही जण करून पाहतात. हे मिश्रण तयार करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. मात्र, लवंगामुळे काही संवेदनशील त्वचेला जळजळ किंवा त्रास होऊ शकतो, त्यामुळे वापरण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे.

Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा वाढलाय? ग्लिसरीन आणि लवंगापासून घरच्या घरी तयार करा 'हे' सिरम
Winter Hair Care : हिवाळ्यात केसांचा कोरडेपणा आणि फ्रिझीनेस वाढलाय? तज्ज्ञांनी सांगितले केसांची काळजी घेण्याचे सोपे उपाय

ग्लिसरीन आणि लवंगांपासून सिरम कसे तयार कराल?

१. ग्लिसरीन घ्या : सर्वप्रथम एका स्वच्छ वाटीत दोन टेबलस्पून ग्लिसरीन घ्या. ग्लिसरीन त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करणारा घटक म्हणून ओळखला जातो.

२. लवंग मिसळा : या ग्लिसरीनमध्ये आठ ते दहा लवंग टाका. त्यानंतर डबल बॉयलर पद्धतीने हे मिश्रण हलके गरम करा. थेट आचेवर ठेवून गरम करणे टाळा.

३. मिश्रण गाळून घ्या : मिश्रण थंड झाल्यानंतर ते स्वच्छ गाळणीने गाळून घ्या. तयार झालेले मिश्रण स्वच्छ, कोरड्या डबीत साठवा.

४. वापरण्यापूर्वी चाचणी करा : हे सिरम थेट चेहऱ्यावर लावण्याआधी हाताच्या आतील बाजूला किंवा कानामागे थोडे लावून पॅच टेस्ट करा. २४ तासांत जळजळ, खाज, लालसरपणा किंवा सूज जाणवली नाही तरच वापरण्याचा विचार करा. त्रास जाणवल्यास वापर करू नका.

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • चेहरा धुण्यासाठी खूप गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा.

  • चेहरा धुतल्यानंतर त्वचा पूर्ण कोरडी होण्याआधी योग्य मॉइश्चरायझर लावा.

  • त्वचा कोरडी असल्यास सुगंध नसलेले आणि त्वचेला अनुकूल असे मॉइश्चरायझर निवडा.

  • चेहऱ्यावर खाज, जळजळ किंवा लालसरपणा असल्यास घरगुती प्रयोग टाळा.

  • दिवसा बाहेर जाताना सनस्क्रीन वापरणेही महत्त्वाचे आहे.

Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा वाढलाय? ग्लिसरीन आणि लवंगापासून घरच्या घरी तयार करा 'हे' सिरम
दिवाळीत सुंदर दिसायचंय? आजपासूनच सुरू करा ३ गोष्टी; चेहरा, केस आणि फिटनेससाठी ऋजुता दिवेकरांनी सांगितला सोपा मार्ग

हिवाळ्यात त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी नियमित काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मात्र, प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे घरगुती मिश्रण वापरण्यापूर्वी त्यातील घटक त्वचेला अनुकूल आहेत की नाही, याची खात्री करून घ्या.

(डिस्क्लेमर : या लेखातील माहिती सामान्य स्वरूपाची असून, घरगुती उपायांच्या परिणामांची नवशक्ती हमी देत नाही. प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार आणि संवेदनशीलता वेगळी असते. कोणताही उपाय चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी. त्वचेचा त्रास असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)