इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्चे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी ठार 
आंतरराष्ट्रीय

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्चे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी ठार

आमच्या क्षेपणास्त्र उद्योगाला परिपूर्ण गुण मिळायला हवेत आणि याबाबत कोणतीही चिंता नाही, कारण युद्धाच्या परिस्थितीतही आम्ही क्षेपणास्त्र उत्पादन सुरू ठेवले आहे, युद्धकाळातही इराणचे क्षेपणास्त्र उत्पादन सुरू राहते आणि आमच्याकडे कोणत्याही चिंतेशिवाय पुरेसा साठा उपलब्ध आहे, असा दावा करणारे इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डचे (आयआरजीसी) प्रवक्ते अली मोहम्मद नैनी एका हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे.

Swapnil S

तेहरान : आमच्या क्षेपणास्त्र उद्योगाला परिपूर्ण गुण मिळायला हवेत आणि याबाबत कोणतीही चिंता नाही, कारण युद्धाच्या परिस्थितीतही आम्ही क्षेपणास्त्र उत्पादन सुरू ठेवले आहे, युद्धकाळातही इराणचे क्षेपणास्त्र उत्पादन सुरू राहते आणि आमच्याकडे कोणत्याही चिंतेशिवाय पुरेसा साठा उपलब्ध आहे, असा दावा करणारे इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डचे (आयआरजीसी) प्रवक्ते अली मोहम्मद नैनी एका हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे.

अमेरिका- इस्रायलसोबतच्या युद्धामुळे संपूर्ण

आखाती प्रदेशात तणाव कायम असून इराणच्या सरकारी माध्यमांनी शुक्रवारी हे वृत्त दिले आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात नैनी मारले गेले आहेत, असे सरकारी माध्यमांनी वृत्त दिले. अमेरिकेने केलेल्या गुन्हेगारी भ्याड दहशतवादी हल्ल्यात नैनी शहीद झाले, असे एका वृत्तसंस्थेने गार्ड्सच्या 'सेपाह न्यूज' वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार म्हटले आहे.

प्रभावशाली अधिकारी गमावले

अली मोहम्मद नैनी यांच्या मृत्यूमुळे या आठवड्यात इराणी नेतृत्वाला चौथा मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांत इराणने तीन अत्यंत प्रभावशाली अधिकाऱ्यांना गमावले आहे. या हल्ल्यांमध्ये वरिष्ठ सल्लागार अली लारीजानी, बसिज स्वयंसेवक दलाचे प्रमुख गुलामरेझा सोलेमानी आणि इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब या सर्वांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, दुसरीकडे इस्त्रायलने या हल्ल्यांबाबत सांगितले की, आतापर्यंत इस्त्रायलकडून इराणशी संबंधित १३० पेक्षा अधिक इंफ्रास्ट्रक्चर साइटवर हल्ला करण्यात आला आहे. यातील सर्वाधिक हल्ले हे पश्चिम आणि मध्य इराणमध्ये करण्यात आले आहेत.

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया