Photo : X (@thebrandonsun)
आंतरराष्ट्रीय

इस्रायलचे गाझावरील हल्ले सुरूच; ८५ जणांचा मृत्यू

इस्रायलने गाझावर सलग दुसऱ्या दिवशी हल्ले सुरूच ठेवले आहेत. या हल्ल्यात ८५ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तीन रुग्णालयांनी दिली.

Swapnil S

दर-अल-बलह : इस्रायलने गाझावर सलग दुसऱ्या दिवशी हल्ले सुरूच ठेवले आहेत. या हल्ल्यात ८५ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तीन रुग्णालयांनी दिली.

खान युनूस, रफाह व बेत लहिया या शहरावर इस्रायलने हल्ले केले. मध्यरात्री केलेल्या या हल्ल्यात अनेक घरांचे नुकसान झाले असून झोपेत असलेले अनेक स्त्री, पुरुष व बालके या हल्ल्यात बळी पडले.

इस्रायलने मंगळवारपासून गाझावर पुन्हा जोरदार हल्ले सुरू केले आहेत. मंगळवारच्या हल्ल्यात ४०० पॅलेस्टिनी ठार झाले. गेले दीड वर्षे सुरू असलेल्या या संघर्षात इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ४९ हजार पॅलेस्टिनी मरण पावलेले आहेत. गाझातील ९० टक्के लोकसंख्या विस्थापित झाली आहे.

IND vs AUS 1st T20: आता लक्ष टी-२० मालिकेकडे! सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आज ऑस्ट्रेलियाशी पहिला सामना

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निधीची चौकशी होणार; राज्य सरकारकडून निधी तपासण्याचे आदेश

Mumbai News : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर BMC मेहेरबान; रेल्वेकडे ५०० कोटी रुपयांचे पाणी बिल थकीत!

महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले; ठाण्यातील ‘त्या’ फलकाची चर्चा!

कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला हायकोर्टाचा दणका; ‘आरएसएस’ला लक्ष्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती