एक्स (@MarioNawfal)
आंतरराष्ट्रीय

इस्त्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? ट्रकची बसथांब्याला धडक, ३५ जण जखमी

राजधानी तेल अवीवजवळ ग्लियोट येथे रविवारी एका ट्रकने बसथांब्याला धडक दिली. या घटनेत ३५ हून अधिक जण जखमी असून, ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.

Swapnil S

तेल अवीव : राजधानी तेल अवीवजवळ ग्लियोट येथे रविवारी एका ट्रकने बसथांब्याला धडक दिली. या घटनेत ३५ हून अधिक जण जखमी असून, ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा दहशतवादी हल्ला असावा, असा संशय इस्रायली पोलिसांनी व्यक्त केला.

इस्त्रायली घटनास्थळावरील लोकांनी ट्रक चालकावर गोळी झाडली आणि त्याला रोखले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, प्रवाशांना उतरवण्यासाठी एक बस थांब्यावर थांबली होती. याचवेळी एका ट्रकने बस आणि थांब्यावर उपस्थित असलेल्या लोकांना धडक दिली. यात ३५ जण जखमी झाले. विशेष म्हणजे ज्या भागात ही घटना घडली. तेथे ‘मोसाद’चे मुख्यालय तसेच ‘आयडीएफ’चा गुप्तचर विभाग आहेत.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप