(Photo - X/@AJEnglish)
आंतरराष्ट्रीय

इस्रायली हल्ल्यात 'अल-जझीरा'चे ५ पत्रकार ठार; हमासचा दहशवादी अनस अल-शरीफचा खात्मा केल्याचा IDF चा दावा

गाझा शहरातील अल-शिफा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ रविवारी (दि.१०) रात्री उशिरा इस्रायली हवाई हल्ला झाला. या हल्ल्यात अल-जझीरा अरेबिकचा प्रतिनिधी अनस अल शरीफ याच्यासह पाच पत्रकार ठार झाल्याचे समोर आले आहे.

नेहा जाधव - तांबे

गाझा शहरातील अल-शिफा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ रविवारी (दि.१०) रात्री उशिरा इस्रायली हवाई हल्ला झाला. या हल्ल्यात अल-जझीरा अरेबिकचा प्रतिनिधी अनस अल-शरीफ याच्यासह पाच पत्रकार ठार झाल्याचे समोर आले आहे. तर, इस्रायली सैन्याने (IDF) अनस अल-शरीफ हा हमासच्या दहशतवादी सेलचा प्रमुख असल्याने हा हल्ला केल्याचे स्पष्ट केले.

शिफा हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला असून त्यात पाच पत्रकारांचा समावेश आहे. मृत पत्रकारांमध्ये अनस अल-शरीफ याच्यासोबत करस्पॉन्डट मोहम्मद क्रेइकेह, कॅमेरा ऑपरेटर इब्राहिम झहेर, मोहम्मद नौफल आणि मोअमेन अलिवा यांचा समावेश आहे.

इस्रायली सैन्याने निवेदन जारी करताना अनस अल-शरीफ हा हमासच्या दहशतवादी सेलचा प्रमुख असल्याचा दावा केला आहे. तसेच इस्रायली नागरिक आणि सैन्यावर रॉकेट हल्ले घडवून आणण्यात त्याचा सहभाग असल्याचेही म्हटले आहे. इस्रायलने अनेक पॅलेस्टिनी पत्रकारांवर हमासशी संबंध असल्याचा आरोप या आधीही अनेकदा केला आहे.

मात्र, पॅलेस्टिनी पत्रकार संघटना आणि अल-जझीराने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत, हा हल्ला माध्यम स्वातंत्र्यावर झालेला गंभीर आघात असल्याचे म्हटले आहे.

ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने दक्षिण इस्रायलमध्ये घुसून १२०० लोकांचा बळी घेतला आणि २५१ लोकांना ओलीस ठेवले होते. या नंतर इस्रायल आणि गाझामध्ये संघर्ष चिघळला. इस्रायलच्या हल्ल्यांत आतापर्यंत ६१००० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाल्याचा दावा गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.

Mumbai : पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर; धरण क्षेत्रात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा

प्रथमच 'फायर इंजिन'चे स्टेअरिंग महिलेच्या हाती; आत्मविश्वास असेल तर अशक्य ही शक्य - पल्लवी पाटील यांचा विश्वास

लग्नपत्रिकेत वधूवरांची जन्म तारीख बंधनकारक करण्याचा विचार; बालविवाह रोखण्यासाठीचा उपाय

यंदाची आषाढी वारी जगभर पोहोचणार; डिस्कव्हरी आणि जिओग्राफी वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण

मान्सूनने महाराष्ट्र घेतला कवेत; १४ जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’