आंतरराष्ट्रीय

इस्तंबूलमध्ये इस्रायली दूतावासावर हल्ला; एक हल्लेखोर ठार, दोन ताब्यात

तुर्किएची राजधानी इस्तंबूलमध्ये मंगळवारी इस्रायली दूतावास असलेल्या एका टोलेजंग इमारतीबाहेर तैनात असलेल्या पोलिसांवर तीन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत एक हल्लेखोर ठार झाला असून, इतर दोघांना जखमी अवस्थेत पकडले आहे.

Swapnil S

इस्तंबूल : तुर्किएची राजधानी इस्तंबूलमध्ये मंगळवारी इस्रायली दूतावास असलेल्या एका टोलेजंग इमारतीबाहेर तैनात असलेल्या पोलिसांवर तीन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत एक हल्लेखोर ठार झाला असून, इतर दोघांना जखमी अवस्थेत पकडले आहे. तुर्किएचे न्यायमंत्री अकिन गुरलेक यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

इस्तंबूलचे गव्हर्नर दावूत गुल यांनी पत्रकारांना माहिती दिली की, या चकमकीत दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. हल्लेखोरांकडे लांब पल्ल्याची अत्याधुनिक शस्त्रे होती. गृहमंत्री मुस्तफा चिफ्ती यांनी एक्सवर माहिती दिली की, हल्लेखोर शेजारच्या इझमित शहरातून भाड्याने घेतलेल्या कारने इस्तंबूलमध्ये आले होते.

एका हल्लेखोराचा संबंध ‘धर्माचा गैरवापर करणाऱ्या’ एका गटाशी असल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र संघटनेचे नाव अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. पकडलेल्या हल्लेखोरांपैकी दोघे भाऊ असून, त्यातील एकावर अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत.

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी

मुंबईसह तीन विद्यापीठांत आता 'कुलपती पदक'; राज्यपालांच्या हस्ते मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश

GSB गणपतीचे १२ सप्टेंबरपासून दर्शन; मंडळाने उतरवला ७०३ कोटींचा विमा

अस्सल पैठणीला आता बारकोड आणि लोगोचा साज! राज्य शासनाचा निर्णय; स्कॅन करताच मिळणार धागा, कारागीर आणि निर्मितीची माहिती

सरसकट बंदी नको, आवाजाची मर्यादा आखून द्या; पुण्यातील तरुणांनी सुचवला उपाय