आंतरराष्ट्रीय

हंगेरीचे लेखक क्रास्नाहोरकाई यांना साहित्याचे नोबेल; प्रभावी, दूरदर्शी साहित्यनिर्मितीमुळे पुरस्कार

तत्त्वचिंतनात्मक आणि ब्लॅक कॉमेडीने भरलेल्या कादंबऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या हंगेरीच्या लेखक लाझ्लो क्रास्नाहोरकाई यांना त्यांच्या “प्रभावी आणि दूरदर्शी साहित्यनिर्मिती”साठी गुरुवारी साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले.

Swapnil S

स्टॉकहोम : तत्त्वचिंतनात्मक आणि ब्लॅक कॉमेडीने भरलेल्या कादंबऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या हंगेरीच्या लेखक लाझ्लो क्रास्नाहोरकाई यांना त्यांच्या “प्रभावी आणि दूरदर्शी साहित्यनिर्मिती”साठी गुरुवारी साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले.

नोबेल पुरस्कार मिळाल्याने क्रास्नाहोरकाई हे अर्नेस्ट हेमिंग्वे, अल्बर्ट काम्यू आणि टोनी मॉरिसन यांसारख्या महान साहित्यिकांच्या पंक्तीत सामील झाले आहेत.

स्वीडिश अकादमीने म्हटले की, लाझ्लो यांच्या रचना अत्यंत प्रभावशाली आणि दूरदर्शी आहेत. त्या जगातील भय आणि दहशतीच्या वातावरणातही कलेची शक्ती दाखवतात.

गेल्या वर्षीचा पुरस्कार दक्षिण कोरियाच्या लेखिका ‘हान कांग’ यांना त्यांच्या “इतिहासातील जखमा आणि मानवी जीवनाची नाजूकता” यांना भिडणाऱ्या साहित्यकृतींसाठी मिळाला होता.

साहित्यातील नोबेल हा या आठवड्यात जाहीर झालेला चौथा पुरस्कार असून, याआधी औषधशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या क्षेत्रांतील नोबेल विजेते घोषित झाले आहेत.

नोबेल पुरस्कार वितरण समारंभ १० डिसेंबर रोजी होणार आहे. प्रत्येक पुरस्कारासोबत ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (सुमारे १०.३ कोटी) रक्कम, १८ कॅरेट सोन्याचे पदक आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाते.

क्रास्नाहोरकाई यांना बुकरसह विविध पुरस्कार

लाझ्लो क्रास्नाहोरकाई यांना २०१५ मध्ये बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, २०१९ मध्ये नॅशनल बुक ऑफ ट्रान्स्लेटेड लिटरेचर पुरस्कार तसेच अन्य प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. स्वीडिश अकादमीच्या नोबेल समितीने हा साहित्यातील पुरस्कार ११७ वेळा दिला आहे.

AQI १०५ वर पोहोचला! मुंबईत हवेची गुणवत्ता घसरली; हिवाळ्यात प्रदूषणाचा उच्चांक गाठण्याची शक्यता

उमेश कोल्हे हत्याकांड : विशेष NIA न्यायालयाने शकील शेखचा फेटाळला जामीन

Mumbai Metro 3 : पहिल्याच दिवशी चर्चगेट स्थानकावर प्रवाशांची मोठी गैरसोय, व्हिडिओ व्हायरल

२०२२ पूर्वी भ्रूण गोठवले असल्यास सरोगसी कायद्यातून सूट; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

ई-बस प्रवाशांसाठी खुशखबर; एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना