(Photo-X/@ThePageZ_)
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा; ११ हजार विमानांची उड्डाणे रद्द, १५३ वर्षांत प्रथमच वृत्तपत्राची छपाई नाही

अमेरिकेला हिमवादळाचा जोरदार तडाखा बसला असला असून त्यामुळे ११ हजार विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. त्याचप्रमाणे पाच लाख घरांमधील वीज खंडित झाली असून १५३ वर्षात प्रथमच वर्तमानपत्रही छापले जाऊ न शकण्याचा प्रकार घडला आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेला हिमवादळाचा जोरदार तडाखा बसला असला असून त्यामुळे ११ हजार विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. त्याचप्रमाणे पाच लाख घरांमधील वीज खंडित झाली असून १५३ वर्षात प्रथमच वर्तमानपत्रही छापले जाऊ न शकण्याचा प्रकार घडला आहे.

परिस्थिती इतकी बिघडली की अनेक राज्यांमध्ये आणीबाणी घोषित करावी लागली. न्यूयॉर्क शहरात शाळा, रस्ते, पूल आणि महामार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. नंतर परिस्थिती सुधारल्यावर महापौर जोहरान ममदानी यांनी हा आदेश मागे घेतला आणि शाळा मंगळवारी उघडतील, अशी घोषणा केली.

केवळ सोमवारीच सुमारे ५६०० ते ५७०० उड्डाणे रद्द झाली, जी देशभरातील उड्डाणांच्या सुमारे २० टक्के होती. ही माहिती फ्लाइट ट्रॅकिंग कंपनी फ्लाइटअवेअरने दिली. नॅशनल वेदर सर्व्हिसनुसार, रोड आयलंड आणि मॅसॅच्युसेट्सच्या काही भागांमध्ये सुमारे ३७ इंचपर्यंत बर्फ पडला.

वृत्तपत्र छपाई नाही

बर्फवृष्टीमुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये ६ लाखांहून अधिक घरांची वीज गेली. सोमवार संध्याकाळपर्यंत ५ लाख १९ हजार २३२ घरे आणि कार्यालये विजेविना होती. मुसळधार बर्फवृष्टीमुळे ‘द बोस्टन ग्लोब’ आपल्या १५३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच वृत्तपत्र छापू शकले नाही, कारण कर्मचारी प्रिंटिंग प्रेसपर्यंतच पोहोचू शकले नाहीत.

न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कमध्ये रविवार ते सोमवारदरम्यान सुमारे २० इंच बर्फवृष्टीची नोंद झाली, तर लाँग आयलंडच्या इस्लिप परिसरात २२ इंचांपेक्षा जास्त बर्फ पडला. प्रोविडन्स, रोड आयलंडमध्ये ३२.८8 इंच बर्फवृष्टी झाली, ज्याने १९७८ च्या २८.६ इंचांच्या जुन्या विक्रमाला मोडले.

आणीबाणी घोषित

परिस्थिती इतकी बिघडली की अनेक राज्यांमध्ये आणीबाणी घोषित करावी लागली. न्यूयॉर्क शहरात शाळा, रस्ते, पूल आणि महामार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. नंतर परिस्थिती सुधारल्यावर महापौर जोहरान ममदानी यांनी हा आदेश मागे घेतला आणि सांगितले की शाळा मंगळवारी उघडतील.

नॉरईस्टर वादळ

हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, हे गेल्या सुमारे एका दशकातील सर्वात शक्तिशाली नॉरईस्टर वादळ आहे. अनेक भागांमध्ये प्रति तास २ ते ३ इंच बर्फ पडण्याचा इशारा देण्यात आला आहे आणि काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ११० मैल प्रति तास इतका पोहोचला आहे. नॉरईस्टर हे एक प्रकारचे तीव्र वादळ आहे जे अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर येते. याला नॉरईस्टर असे म्हणतात कारण त्यात वारे साधारणपणे ईशान्य (नॉर्थ-ईस्ट) दिशेने वाहतात.

दिल्ली विमानतळावर दोन विमानांची धडक; अकासा एअर आणि स्पाइसजेटचे नुकसान, प्रवासी सुखरूप

TCS प्रकरणात दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम चौकशीसाठी नाशिकमध्ये; १५० कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे निर्देश

गोरेगावमधील मोतीलालनगर पुनर्विकासाचा मास्टर प्लान लवकरच; उच्च दर्जाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार

VIDEO : लखनऊमधील झोपडपट्टीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांमुळे शेकडो झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर

Bigg Boss Marathi 6: पहिली फायनलिस्ट तन्वी कोलते अडचणीत? 'त्या' वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप, विजेतेपदाच्या चर्चेला नवं वळण