PTI
आंतरराष्ट्रीय

मोदींनी केली पुतिन यांच्याशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी संपर्क साधून त्यांना युक्रेन दौऱ्याबाबतची माहिती दिली.

Swapnil S

­नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी संपर्क साधून त्यांना युक्रेन दौऱ्याबाबतची माहिती दिली. रशिया आणि युक्रेनमधील संघर्षात लवकर आणि शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघावा यासाठी पाठिंबा देण्यास भारत बांधील आहे, असे मोदी यांनी पुतिन यांना सांगितले.

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ व्हावेत यासाठीच्या उपाययोजनांवरही पुतिन यांच्यासमवेत चर्चा केल्याचे मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. रशिया-युक्रेन संघर्षाबाबतचा दृष्टिकोन आणि युक्रेन दौऱ्यात आलेला अनुभव याबाबतही पुतिन यांच्याशी चर्चा केली.

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

वैद्यकीय प्रवेश निकालाचा घोळ न्यायालयात; सरकारला भूमिका मांडण्याचे निर्देश; सुनावणी आता १३ नोव्हेंबरला

Mumbai : सेव्हन हिल्स हॉस्पिटल BMC च्या ताब्यात द्या! अंधेरी विकास समितीचा उद्या आंदोलनाचा इशारा