आंतरराष्ट्रीय

कॅनडात भारतीय वंशाच्या व्यक्तीवर मंदिरांच्या दानपेट्यांमधून पैसे चोरीचा आरोप, झाली अटक

ब्रॅम्प्टन येथील जगदीश पंढेर यांच्यावर पूजास्थळे फोडून आत प्रवेश केल्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल आहेत

Swapnil S

ओटावा : कॅनडाच्या पील भागात मंदिरे फोडून दानपेट्यांमधून पैसे चोरल्याचा आरोप एका ४१ वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीवर ठेवण्यात आला आहे.

ब्रॅम्प्टन येथील जगदीश पंढेर यांच्यावर पूजास्थळे फोडून आत प्रवेश केल्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल आहेत. पील पोलिसांनी ग्रेटर टोरंटो क्षेत्रातील इतर पोलीस विभागांच्या सहकार्याने घटनांचा तपास केला आणि पंढेरला अटक केली.

पील प्रादेशिक पोलिसांनी सांगितले की, गेल्या वर्षी मार्च ते ऑगस्ट दरम्यान अधिकाऱ्यांनी मंदिरांमध्ये तीन ब्रेक-इन तपासले, जेथे पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांनी दानपेट्यांमधून पैसे घेत असलेल्या चोराच्या प्रतिमा टिपल्या. यापैकी काही गुन्हे प्रार्थनास्थळांवर घडले असून ते रोख चोरी करण्याच्या संधीचे गुन्हे होते आणि द्वेषाने प्रेरित नव्हते, असे तपासकर्त्यांनी सांगितले.

FDA ची राज्यव्यापी कारवाई; १.९० कोटींचा साठा जप्त; मुंबईतील ६ पानटपऱ्यांवर कारवाई

Mumbai : सीएसएमटी रेल्वे स्थानकाला बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क, पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू

Mumbai : छठपूजेनिमित्त बेस्टची विशेष बससेवा; जुहू बीचवर जाण्यासाठी २२ अतिरिक्त बस, जाणून घ्या मार्ग अन् वेळ

सोनाक्षी सिन्हाच्या मॉर्फ फोटोंप्रकरणी दिल्लीतील तरुणाला अटक; पण कोर्टाकडून आरोपीची सुटका, नेमकं कारण काय?

IndiGo Emergency Landing : गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड; पुण्यात आपत्कालीन लँडिंग, १९२ जण सुखरूप